COVID-19: भारतीय एअरलाइन्सला उतरती कळा, तरी 7 लाख किमीचा प्रवास करत पोहोचवल्या 4300 टन अत्यावश्यक वस्तू

COVID-19: भारतीय एअरलाइन्सला उतरती कळा, तरी 7 लाख किमीचा प्रवास करत पोहोचवल्या 4300 टन अत्यावश्यक वस्तू

भारतीय एअरलाइन्सनी लॉकडाऊननंतर देशात आणि परदेशात एकूण 7 लाख किलोमीटरचा प्रवास करून 626 उड्डाणातून 4300 टन आवश्यक सामान पोहोचवले आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 एप्रिल : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी 3 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. या कालावधीमध्ये देशातील सर्व विमानकंपन्यांची आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. परिणामी विमान कंपन्यांना सर्वात मोठा फटका लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये सहन करावा लागत आहे. उड्डाणं बंद असली तरीही कोरोनाच्या या लढाईत विमान कंपन्या त्यांचं योगदान देत आहेत. भारतीय एअरलाइन्सनी लॉकडाऊननंतर देशात आणि  परदेशात एकूण 7 लाख किलोमीटरचा प्रवास करून 626 उड्डाणातून 4300 टन आवश्यक सामान पोहोचवले आहे.

(हे वाचा-विमान उड्डाण आणखी लांबणीवर, 3 मेपर्यंतचा लॉकडाऊन संपल्यानंतर होणार निर्णय)

या आवश्यक सामानामध्ये मुख्यत: औषधे, मास्क आणि ग्लोव्ह्जचा समावेश आहे. या कामामध्ये एअर इंडिया, स्पाइस जेट, इंडिगो, गोएअर, एअर एशिया आणि ब्लू डार्ट यांनी सहभाग घेतला आहे. सरकारकडून मोफत देण्यात येणाऱ्या काही औषधांचा देखील यामध्ये समावेश आहे. या कार्गो उड्डाणांद्वारे देशातील दुर्गम भागात औषधे पोहोचवण्याचे काम एअरलाइन्सनी केले आहे. अशा 128 उड्डाणांचे संचालन एअर इंडिया आणि त्यांची साहाय्यक कंपनी अलायन्स एअरने केले आहे. लाइफलाइन उडान स्कीमअंतर्गत त्यांनी एकूण 2 लाख किलोमीटरचे अंतर पार केले आहे.

(हे वाचा-LOCKDOWN 2-घरबसल्या खरेदी करा स्वस्त सोनं,20 एप्रिलपासून मोदी सरकार करणार विक्री)

काही खाजगी विमान कंपन्यांनी देखील यामध्ये सहभाग दाखवला होता. खाजगी विमान कंपनी स्पाइस जेटने या योजनेअंतर्गत 4 लाख किलोमीटरचे अंतर पार केले आहे. त्यांनी 286 उड्डाणांचे संचालन केले आहे ज्यामध्ये 87 आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा समावेश आहे. इंडिगोने 22 हजार किलोमीटरचे अंतर कव्हर केले आहे आणि त्यांनी 25 कार्गो विमानांटे संचलन केले. आणखीही काही विमान कंपन्यांनी यामध्ये सहभागी होत आपले योगदान दिले आहे.

भारतीय विमान कंपन्यांची आर्थिक स्थिती गंभीर

लॉकडाऊननंतर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान उड्डाण बंद आहेत. परिणामी विमान कंपन्या डबघाईला पोहोचतील की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. केवळ इंडिगो (Indigo) एअरलाइनकडे काही रिझर्व्ह कॅश शिल्लक आहे. कोव्हिड-19 (COVID-19) चे संकट संपल्यानंतर कोणती एअरलाइन त्यांचं अस्तित्व टिकवण्यात यशस्वी ठरते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

संपादन- जान्हवी भाटकर

First published: April 14, 2020, 5:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading