हवाई दलाच्या बेपत्ता विमानाचा शोध सुरूच, गावकऱ्यांना डोंगरामध्ये दिसला होता धूर

हवाई दलाच्या बेपत्ता विमानाचा शोध सुरूच, गावकऱ्यांना डोंगरामध्ये दिसला होता धूर

भारताच्या हवाई दलाचं AN-32 हे लढाऊ विमान अजूनही बेपत्ताच आहे. हे विमान शोधण्यासाठीची मोहीम आणखी तीव्र करण्यात आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 7 जून : भारताच्या हवाई दलाचं AN-32 हे लढाऊ विमान अजूनही बेपत्ताच आहे. हे विमान शोधण्यासाठीची मोहीम आणखी तीव्र करण्यात आली आहे. सोमवारी, 3 जूनला हे विमान अरुणाचल प्रदेशमधून गायब झालं होतं.

हवाई दलाने या मोहिमेत आता स्थानिक लोक आणि पोलिसांची मदत घेतली आहे. अरुणाचल प्रदेशच्या पहाडी भागात राहणाऱ्या गावकऱ्यांनी सोमवारी डोंगरातून धूर बाहेर आल्याचं पाहिलं होतं. त्याठिकाणी आता या विमानाचा शोध सुरू आहे.

आसाममधून केलं होतं उड्डाण

हवाई दलाच्या AN-32 या विमानाने आसाममधल्या जोरहाटमधून उड्डाण केलं होतं. त्यानंतर या विमानाचा नियंत्रण कक्षाशी दुपारी एक वाजता शेवटचा संपर्क झाला होता. विमानामध्ये वैमानिकासह आठ जण आणि पाच प्रवासी होते.

या विमानाच्या शोधमोहिमेबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना वेळोवेळी अपडेट दिले जात आहेत. अरुणाचल प्रदेशमधला हा दुर्गम डोंगराळ भाग असल्यामुळे इथे शोधमोहीम राबवणंही जिकिरीचं झालं आहे.

आशिष तन्वर चालवत होते विमान

ज्यावेळी हे विमान बेपत्ता झालं तेव्हा वैमानिक आशिष तन्वर ते चालवत होते. आशिष तन्वर हे हरियाणामधल्या पलवलचे आहेत. त्यांची पत्नी संध्या याही हवाऊ दलाच्या एअर ट्रॅफिक कंट्रोल विभागात काम करतात.

...आणि संपर्क तुटला

ज्यावेळी आशिष यांच्या विमानाने अरुणाचल प्रदेशच्या दिशेने उड्डाण केलं त्यावेळी त्यांची पत्नी संध्या जोरहाटमध्ये ड्युटी करत होत्या. आशिष यांनी संध्या यांच्यासोबत 18 मे ला सुटी घालवली आणि ते कामावर रुजू झाले. संध्या यांच्याकडे आता त्यांच्या पतीच्या याच आठवणी उरल्या आहेत. आशिष तन्वर यांचं विमान गायब झाल्यानंतर त्यांच्या घरी लोकांची रीघ लागली आहे.

===================================================================================================

SPECIAL REPORT : धोनीच्या ग्लोव्ह्जवरून का पेटला वाद, आयसीसीचा काय आहे आक्षेप?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 7, 2019 06:31 PM IST

ताज्या बातम्या