News18 Lokmat

हवाई दलाच्या पॅराट्रूपरचा विचित्र अपघातात मृत्यू; 11000 फुटांवरून मारली उडी, पण....

भारतीय हवाई दलाच्या एका पॅरा ट्रूपरचा विचित्र अपघातात मृत्यू झाला. उत्तर प्रदेशात आग्र्याच्या पॅरा ड्रॉपिंग झोनमध्ये हवाई दलाच्या सैनिकांचा सराव सुरू होता. हेलिकॉप्टरवरून 11000 फुटांवर गेलेला जवान थेट खाली कोसळला.

News18 Lokmat | Updated On: Mar 9, 2019 01:53 PM IST

हवाई दलाच्या पॅराट्रूपरचा विचित्र अपघातात मृत्यू; 11000 फुटांवरून मारली उडी, पण....

आग्रा, 9 मार्च :   भारतीय हवाई दलाच्या एका पॅरा ट्रूपरचा विचित्र अपघातात मृत्यू झाला. उत्तर प्रदेशात आग्र्याच्या पॅरा ड्रॉपिंग झोनमध्ये हवाई दलाच्या सैनिकांचा सराव सुरू होता. त्या वेळी हा अपघात झाला.

गुरुवारी रात्री आग्र्याजवळ मलपुराच्या या पॅराड्रॉपिंग झोनमध्ये सराव सुरू होता. तेव्हा ही घटना घडली. नेहमीच्या सरावाचा भाग म्हणून पॅरा डायव्हिंग प्रॅक्टिस ड्रील सुरू होतं. हे प्रॅक्टिस ड्रील सुरू असताना जवान विमान काही ठरावीक उंचीवर गेलं की, त्यातून उडी मारतात.

एका जवानाने साधारण 11000 फुटांवरून उडी मारली. पण त्याच्या मागे बांधलेलं पॅराशूट काही तांत्रिक कारणांनी उघडलंच नाही. या जवानाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, पण त्या आधीच त्याच मृत्यू झाला.

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या जवानाचं नाव हरदीप सिंह असल्याचं पुढे येत आहे. 26 वर्षांचे हरदीप सिंह पॅराट्रूपरचे जवान होते. सरावादरम्यान हरदीप सिंह यांना घेऊन हेलिकॉप्टर उडालं आणि 11000 फुटांवर पोहोचल्यावर हरदीप यांनी उडी मारली. पण पॅराशूट उघडलंच नाही. खरं तर इमर्जन्सीच्या वेळी उघडण्यासाठी एका आणखी पॅराशूटची सोय असते. पण हरदीप सिंह यांच्याकडून तेही पॅराशूट उघडलं गेलं नसावं. आणि हरदीप सिंह थेट जमिनीवर कोसळले आणि जबर जखमी झाले.

या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. नेमका हा अपघात कसा झाला याविषीय आणखी माहिती चौकशीअंती स्पष्ट होईल.

Loading...


Special Report : रेस्क्यूचा थरार, 50 फूट खोल विहिरीतून 2 बिबट्यांना काढलं बाहेर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 9, 2019 01:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...