कच्छमध्ये वायुदलाचं विमान कोसळलं, वैमानिकाचा मृत्यू

भारतीय हवाई दलाचं जॅग्वार हे लढाऊ विमान कच्छ जिल्ह्यातील मुंद्रा परिसरात कोसळले. या दुर्घटनेत वैमानिक एअर कमांडर संजय चौहान मृत्यू झाला आहे. संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jun 5, 2018 01:07 PM IST

कच्छमध्ये वायुदलाचं विमान कोसळलं, वैमानिकाचा मृत्यू

कच्छ, 05 जून : भारतीय हवाई दलाचं जॅग्वार हे लढाऊ विमान कच्छ जिल्ह्यातील मुंद्रा परिसरात कोसळले. या दुर्घटनेत वैमानिक एअर कमांडर संजय चौहान यांचा मृत्यू झाला आहे. संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली. जामनगरातील हवाई तळावर नियमित सराव सुरू असताना जॅग्वार हे लढाऊ विमान बेरजा गावाजवळील माळरानावर कोसळले.

या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या संजय चौहान या वैमानिकाचा मृत्यू झाल्याची माहिती संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिली. माळरानावर चरत असलेल्या पाच गायींचाही या दुर्घटनेत मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते.

दरम्यान, अपघाताचं कारण समजू शकलं नसून, चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती लेफ्टनंट कर्नल मनीष ओझा यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 5, 2018 01:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close