धाडसाचा सन्मान! विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना वीर चक्र, स्वातंत्र्य दिनी होणार गौरव

धाडसाचा सन्मान! विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना वीर चक्र, स्वातंत्र्य दिनी होणार गौरव

Abhinandan Varthaman : भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचा वीर चक्र पुरस्कारानं सन्मान केला जाणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 ऑगस्ट : भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचा वीर चक्र पुरस्कारानं सन्मान केला जाणार आहे. स्वातंत्र्य दिनी केंद्र सरकारकडून त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानविरोधात करण्यात आलेल्या एअरस्ट्राईक कारवाईवेळी अभिनंदन यांनी देशासाठी दाखवलेल्या धाडसाबाबत त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. एअरस्ट्राईक कारवाईनंतर भारतीय हद्दीत बिथरलेल्या पाकिस्तानच्या एफ-16 लढाऊ विमान घुसखोरी केली होती. यावेळेस हवाईदलाच्या मिग-21 बायसन विमानानं पाकिस्तानचं एफ-16 विमान पाडलं. पाकिस्तानच्या एफ-16 लढाऊ विमानाचा पाठलाग करतानाच अभिनंदन वर्धमान यांचं मिग-21 विमान चुकून पाकिस्तानच्या हद्दीत शिरलं. विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर अभिनंदन यांनी पॅराशूटने खाली उडी मारली. पण चुकून ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये पोहोचले. यानंतर अभिनंदन यांना पाक सैन्यानं आपल्या ताब्यात घेतलं. पाकिस्तानी सैन्यानं प्रचंड मानसिक अत्याचार करत अभिनंदन यांच्याकडून गोपनीय माहिती काढून घेण्याचा प्रयत्न केला. पण या दबावाला बळी न पडता पाकच्या ताब्यात असतानाही अभिनंदन यांनी प्रचंड धैर्य दाखवलं. त्यांच्या या धाडसाचं देशातच नाही तर देशाबाहेर कौतुक झालं. अखेर आंतरराष्ट्रीय दबावापुढे झुकून पाकिस्ताननं अभिनंदन यांना भारताच्या स्वाधीन केलं.

(वाचा : विकृतीचा कळस! गर्भवती तरुणीवर सामूहिक बलात्कार, 12 तासांत 11 वेळा केले अत्याचार)

(वाचा : नागपुरात इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीला अश्लील क्लीप व्हायरल करण्याची धमकी)

देशासाठी दाखवलेल्या याच लढवय्या वृत्तीसाठी अभिनंदन यांना वीर चक्र देऊन त्यांचा सन्मान केला जाणार आहे. तसंच ज्या वैमानिकांनी पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांची तळ उद्ध्वस्त केली, त्या पाच सर्वश्रेष्ठ वैमानिकांचा हवाई दलाच्या सन्मान चिन्हानं सत्कार केला जाणार आहे.

(वाचा : सावत्र मुलीवर अश्लील कमेंट, श्वेता तिवारीच्या पतीची जामिनावर सुटका)

14 फेब्रुवारी 2019 ला जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी 13 दिवसांनंतर भारतीय हवाई दलानं कुरापती पाकिस्तानविरोधात एअरस्ट्राईक केला आणि बालाकोट परिसरातील दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त केली.

पाण्याची टाकी फुटून 3 जणांचा मृत्यू, पाहा घटनेचा CCTV

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 14, 2019 10:57 AM IST

ताज्या बातम्या