S M L

अभिनंदन यांचा अभिमान, पाकिस्तानमधून भारतात येताच सगळ्यात आधी म्हणाले...!

वाघा बॉर्डरवर विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी भारताच्या ताब्यात सोपवलं. यावेळी सगळ्यात आधी 'आता छान वाटतं आहे' असं अभिनंदन म्हणाले.

Updated On: Mar 2, 2019 07:59 AM IST

अभिनंदन यांचा अभिमान, पाकिस्तानमधून भारतात येताच सगळ्यात आधी म्हणाले...!

वाघा बॉर्डर, 02 मार्च : भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान हे अखेर भारतात परतले आहेत. गेल्या 2 दिवसांपासून संपूर्ण देश त्यांच्या या रिअल हिरोची वाट पाहत होता. अखेर शुक्रवारी रात्री 9:15 मिनिटांनी अभिनंदन यांनी पाकिस्तानची हद्द पार करत भारतात प्रवेश केला. याआधी कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचं कारण देत पाकिस्तानने अभिनंदन यांचा भारतातला प्रवेश लांबवला.

वाघा बॉर्डरवर विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी भारताच्या ताब्यात सोपवलं. यावेळी सगळ्यात आधी 'आता छान वाटतं आहे' असं अभिनंदन म्हणाले. अभिनंदन यांच्या मायदेशी परतल्याने जो आनंद अवघ्या देशाला झाला होता तोच आनंद आणि आपल्या देशाप्रती असलेला अभिमान हा या ढाण्या वाघाच्या डोळ्यांत दिसत होता.

बॉर्डवर भारताकडे आल्यानंतर सगळ्यात आधी अभिनंदन यांना अमृतसरहून दिल्लीला आणण्यात आलं. त्यांना वायुदलाच्या विमानाने पालम एअरपोर्टवर आणण्यात आलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना दिल्लीच्या आरआर रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं आहे तर शनिवारी भारतीय लष्कर आणि गुप्तचर यंत्रणेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अभिनंदन यांची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे.


तुम्ही कितीही कणखर असाल, पण हा VIDEO पाहिल्यानंतर डोळ्यात नक्कीच अश्रू येतील

...आणि वाघा सीमेवर 60 तासांची प्रतिक्षा संपली

सायंकाळी चार वाजता अभिनंदनला भारताला सोपविण्यात येणार होतं. मात्र ही प्रक्रिया लांबत गेली. रात्री 9.15 च्या सुमारात त्याला भारतीय अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आलं. लष्करी शिस्तित अभिनंदन उभा होता. त्याच्यासोबत काही पाकिस्तानी अधिकारी आणि भारतीय उच्चायुक्तालयाचे अधिकारी उपस्थित होते.

Loading...

गुरुवारी त्याला भारताच्या अधिकाऱ्यांना सोपविण्यात आलं होतं. त्यानंतर कागदपत्रांची पुर्तता झाल्यानंतर त्याला वाघा सीमेवर आणण्यात आलं. अभिनंदनला विशेष विमानाने आणण्याची परवानगी द्यावी अशी मागणी भारताने केली होती मात्र ती मान्य करण्यात आली नाही. वाघा सीमेवर अभिनंदनला घ्यायला त्याचे कुटुंबीयही आले होते.

वाघा सीमेवर दररोज होणारा 'बीटिंग द रिट्रीट' हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. त्यामुळे हजारो लोक अभिनंदनच्या स्वागताला थांबले होते.  ढोल ताशे आणि तिरंगा ध्वज घेतलेल्या हजारो लोकांनी त्यांचं स्वागत केलं आणि भारत माती की जय च्या घोषणांनी सर्व परिसर दणाणून सोडला. कन्याकुमारी इथं झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदनच्या शौर्याचं कौतुक केल.

सीमेवर आल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी त्याचा ताबा घेतला. हवाईदलाच्या गुप्तचर विभागाचे लोक आता अभिनंदनची चौकशी करणार आहेत. त्यानंतर त्याला केव्हा कामावर परत घ्यायचं याचा निर्णय हवाई दल घेणार आहे.

रावळपींडीहून अभिनंदनला लाहोरला आणण्यात आलं आणि तिथून त्याला वाघा सीमेवर आणण्यात आलं. ही सगळी प्रक्रिया रेड क्रॉस या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या मदतीने पार पाडली जाते.

हेही वाचा: 'अभिनंदन'ची आई सुद्धा आहे रणरागिनी, जगभरातल्या युद्धग्रस्त उभं केलं काम

गेल्या 24 तासात नेमकं काय घडलं?

बुधवारी सकाळी पाकिस्तानच्या F-16 लढाऊ विमानांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये भारतीय हद्दीत प्रवेश केला.

पाकिस्तानच्या या विमानांना पिटाळण्यासाठी मिग-21 या भारतीय विमानांचे पायलट असलेल्या अभिनंदन यांनी F-16 चा पाठलाग केला.

पाठलाग करताना त्यांनी पाकिस्तानच्या हद्दीत F-16 ला पाडलं मात्र त्यांच्या विमानात बिघाड झाला.

त्यानंतर त्यांनी पॅरेशुटच्या मदतीने खाली उडी घेतली आणि ते पाकिस्तानच्या हद्दीत उतरले.

पाकिस्तानच्या किल्लान या गावात अभिनंदन यांना 27 फेब्रुवारीला पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतलं.

पाकिस्तानच्या माध्यमांनी त्याचे फोटो आणि व्हीडीओ व्हायरल केले.

संध्याकाळी भारताच्या परराष्ट्रमंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी भारताचा एक पायलट बेपत्ता असल्याचं मान्य केलं.

नंतर जगभरातून पाकिस्तानवर दबाव निर्माण झाला. भारतानेही मुत्सद्देगिरीच्या पातळीवर हा विषय हाताळत पाकिस्तानवर मात केली

आणि तणाव निवळण्यासाठी अखेर पाकिस्तानला अभिनंदन वर्तमान याला सोडाव लागलं.


अभिनंदन यांचा मायभूमीत परतण्याचा पहिला VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 2, 2019 06:59 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

  • I agree to receive emails from NW18

  • I promise to vote in this year's elections no matter what the odds are.

    Please check above checkbox.

  • SUBMIT

Thank you for
taking the pledge

Vote responsibly as each vote
counts and makes a difference

Click your email to know more

Disclaimer:

Issued in public interest by HDFC Life. HDFC Life Insurance Company Limited (Formerly HDFC Standard Life Insurance Company Limited) (“HDFC Life”). CIN: L65110MH2000PLC128245, IRDAI Reg. No. 101 . The name/letters "HDFC" in the name/logo of the company belongs to Housing Development Finance Corporation Limited ("HDFC Limited") and is used by HDFC Life under an agreement entered into with HDFC Limited. ARN EU/04/19/13618
T&C Apply. ARN EU/04/19/13626

Live TV

News18 Lokmat
close