बालाकोट एअर स्ट्राइकचा VIDEO आला समोर, पाहा कसा उद्ध्वस्त केला दहशतवाद्यांचा कॅम्प

बालाकोट एअर स्ट्राइकचा VIDEO आला समोर, पाहा कसा उद्ध्वस्त केला दहशतवाद्यांचा कॅम्प

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या हवाई दलाने एअर स्ट्राइक करत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते.

  • Share this:

नवी दिल्ली, 04 ऑक्टोबर : पुलवामात फेब्रुवारी महिन्यात सीआरपीएफ ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर भारताने बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक केला होता. या एअरस्ट्राइकचा व्हिडिओ भारताच्या हवाई दलाने जारी केला आहे. या व्हिडिओत दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याचं दिसतं आहे. पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील बालाकोटमध्ये जैश ए मोहम्मदच्या तळांना भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राइक करून उद्ध्वस्त केलं होतं.

भारतीय वायुदलाने पाकव्याप्त काश्मिरमध्ये मंगळवारी पहाटे मुजफ्फराबाद, चकोटी, बालाकोटमधील अनेक परिसरात बॉम्ब हल्ले केले. या एअर स्ट्राइकमध्ये जैश-ए-मोहम्मदचे अनेक दहशतवादी ठार झाले. सुमारे 200 ते 300 दहशतवादी या हल्ल्यात ठार झाले. भारतीय वायुसेना पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुमारे 60 किमी आत घुसली होती. यावेळी 'मिराज 2000' या 12 लढाऊ विमानांनी दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करत त्यांचे सर्व तळ नेस्तनाबूत केले होते.

भारताकडून लेझर गायडेड बॉम्ब हल्ला करण्यात आला. सुमारे 21 मिनिटं भारताने दहशतवाद्यांच्या या तळांवर एअर स्ट्राइक केलं. यावेळी पाकिस्तानाकडून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण त्याआधीच भारतीय विमानं एअर स्ट्राइक करून भारतात परतली.

VIDEO: प्राण्याचा मुखवटा लावून चोराचा सराफाच्या दुकानावर डल्ला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Balakot
First Published: Oct 4, 2019 01:15 PM IST

ताज्या बातम्या