मध्य प्रदेश, 21 ऑक्टोबर: मध्य प्रदेशातली भिंड (Bhind district) जिल्ह्यातल्या बाबडी गावात भारतीय हवाई दलाचं (Indian Air Force) लढाऊ विमान मिराज -2000 (aircraft Mirage-2000) कोसळलं. हे विमान भिंडच्या दऱ्यांच्या शेतात पडले. विमान शेतात पडताच जमिनीत घुसलं. हवाई दलानं या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, पायलट फ्लाइट लेफ्टनंट अभिलाषचं विमान चालवत होते. विमानात एकच पायलट उपस्थित होते. अपघातस्थळापासून काही अंतरावर ते जखमी अवस्थेत सापडले. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळी 8:15 च्या सुमारास घडली. लोकांनी आकाशात विमानातून धूर निघताना पाहिलं. विमान वेगानं उतारावर येत होतं. धूर पाहताच एकच गोंधळ उडाला.
गावकऱ्यांनी पोलिसांना दिली सूचना
दरम्यान, लोकांनी पॅराशूटही पाहिले. जवान पॅराशूटवर लटकत होता. गावकऱ्यांच्या मते, जेथे विमान पडले तेथे मोठा खड्डा पडला. गावकऱ्यांनी तत्काळ पोलिसांना या अपघाताची माहिती दिली.
हेही वाचा- Porn बघायला नकार दिल्यानं 6 वर्षाच्या मुलीची हत्या, तीन अल्पवयीन मुलांना अटक
एसपी मनोज कुमार सिंह टीमसह घटनास्थळी पोहोचले. या घटनेची माहिती ग्वाल्हेर हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनाही देण्यात आली. हवाई दलाचे पथकही भिंडला पोहोचत आहे.
दोन महिन्यांपूर्वी बाडमेरमध्ये झालं होतं विमान Crash
25 ऑगस्ट रोजी भारतीय वायुसेनेचे एक मिग -21 विमान राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील भूटारिया गावाजवळ कोसळलं होतं. अपघातानंतर वैमानिक सुखरूप होते, कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासन पोहोचले होते. सांगितले जात आहे की, मिग आपल्या नियमित उड्डाणावर होता आणि या दरम्यान हा अपघात झाला.
हेही वाचा- पाकिस्तानच्या कुरापती, ड्रोननं अमृतसरमध्ये केलेल्या कृत्यानंतर BSF चा गोळीबार
विमान कोसळले त्या ठिकाणी काही झोपड्या आणि इतर कच्ची घरे होती. विमान कोसळल्यानं आणि दूरवर घसरत आल्यानं या घरांना आग लागली. मात्र, या काळात कोणतीही जीवितहानी झाली नाही. गावकऱ्यांनी चिखल आणि पाण्याच्या मदतीने विमान आणि घरांमधील आग विझवली.
Published by:Pooja Vichare
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.