Home /News /national /

भारत-पाकिस्तान सीमेजवळ अनपेक्षित दुर्घटना, वायूसेनेचं लढाऊ विमान थेट जमिनीवर कोसळलं, पायलटचा मृत्यू

भारत-पाकिस्तान सीमेजवळ अनपेक्षित दुर्घटना, वायूसेनेचं लढाऊ विमान थेट जमिनीवर कोसळलं, पायलटचा मृत्यू

जैसलमेरमध्ये भारत-पाकिस्तान सीमेजवळ एक अनपेक्षित दुर्घटना घडली आहे. बीदा गावापासून 16 किमी अंतरावर भारतीय वायूसेनेचं मिग-23 हे लढाऊ विमान क्रॅश झालं आहे.

    जयपूर, 24 डिसेंबर : राजस्थानच्या (Rajasthan) जैसलमेर (Jaisalmer) जिल्ह्यातून एक वाईट बातमी समोर आली आहे. जैसलमेरमध्ये भारत-पाकिस्तान सीमेजवळ (India-Pakistan) एक अनपेक्षित दुर्घटना घडली आहे. जैसलमेरच्या सम पोलीस ठाणे हद्दीत बीदा गावापासून 16 किमी अंतरावर वायूसेनेचं मिग-23 हे लढाऊ विमान क्रॅश (MIG-21 aircraft crashed) झालं आहे. या विमान अपघातात पायलटचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित घटना घडली तेव्हा मोठा आवाज आला. घटनेनंतर गावकऱ्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाचे सर्व वरिष्ठ अधिकारी, पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमागे नेमकं काय कारण आहे, याच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती वायूसेनेने दिली आहे. संबंधित घटना ही रात्री जवळपास साडेआठ वाजेच्या सुमारास घडल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात भारतीय वायूसेनेचे विंग कमांडर हर्षित सिन्हा यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय वायूसेनेने या घटनेवर शोक व्यक्त केला असून या कठीण प्रसंगी हर्षित सिन्हा यांच्या कुटुंबासोबत खंबीरपणे सोबत असल्याचं म्हटलं आहे. भारतीय वायूसेनेकडून ट्विटरवर या घटनेची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. "आज संध्याकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास भारतीय वायू सेनेच्या मिग-21 विमानाचा पश्चिम सेक्टरमध्ये प्रशिक्षणादरम्यान उड्डाण करताना अपघात झाला. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत", असं वायूसेनेने ट्विटरवर म्हटलं आहे. हेही वाचा : नगरमधील शाळेला कोरोनाचा विळखा, 19 विद्यार्थी पॉझिटिव्ह विशेष म्हणजे या घटनेआधी याचवर्षी ऑगस्ट महिन्यात बाडमेरमध्ये देखील  मिग-21 विमानाचा अपघात झाला होता. रशिया आणि चीननंतर भारत हा मिग-21 विमानाचा सर्वात मोठा ऑपरेटर आहे. या लढाऊ विमानाला 1964 साली सपरसोनिक फायटर जेट म्हणून घेण्यात आलं होतं. सुरुवातीचे विमान हे रशियात तयार करण्यात आलं होतं. त्यानंतर भारताने या विमाननिर्मितीचे तंत्रज्ञान अवगत केलं होतं. मिग-21 विमानाने 1971 साली भारत-पाकिस्तान युद्धात तसेच 1999 सालाच्या कारगील युद्धात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या