वायुदलाचे मार्शल अर्जन सिंह यांचं निधन

मार्शल अर्जन सिंह यांना ह्रदयविकाराचा झटका आला होता. उपचारादरम्यान आर्मी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Sep 16, 2017 09:45 PM IST

वायुदलाचे मार्शल अर्जन सिंह यांचं निधन

16 सप्टेंबर : भारतीय वायुदलाचे मार्शल अर्जन सिंह यांचं निधन झालंय. ते 98 वर्षांचे होते.मार्शल अर्जन सिंह यांना ह्रदयविकाराचा झटका आला होता. उपचारादरम्यान आर्मी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

आज सकाळी मार्शल अर्जन सिंह यांना ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना तातडीने आर्मी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्मी रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि प्रकृतीची विचारपूस केली होती. तसंच  संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनीही रुग्णालयाला भेट देऊन कुटुंबीयांशी चर्चा केली होती.

संध्याकाळी उपचारादरम्यान अर्जन सिंह यांची प्राणज्योत मालवली. अर्जन सिंग यांना वायुदलाकडून मार्शल ही पदवी दिली गेलीये. ही पदवी निवृत्तीनंतरही राहते. फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या पदासारखंच हे पद आहे. अर्जन सिंह हे १९६९ साली वायुदलातून निवृत्त झाले. १९६५ च्या युद्धातल्या कामगिरीसाठी त्यांना पद्म विभूषण दिलं गेलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 16, 2017 09:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...