भारतीय हवाईदलाने 5 वर्षात गमावली 44 लढाऊ विमानं

भारतीय हवाईदलाने 5 वर्षात गमावली 44 लढाऊ विमानं

च वर्षात दरवर्षी किमान 11 विमानांचा अपघात झाल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट होतंय. मृत्यू झालेल्यांमध्ये 12 पायलट, 27 जवान आणि 7 एअर क्रू कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 3 जुलै :  भारतीय हवाई दलाने गेल्या पाच वर्षात विविध अपघातांमध्ये तब्बल 44 विमाने आणि हेलिकॉपटर्स गमावली आहेत. या अपघातांमध्ये 46 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज संसदेत दिली. यात 26 जेट, 6 हेलिकॉप्टर, 9 प्रशिक्षण विमानं आणि तीन मालवाहू विमानांचा समावेश आहे.

गेल्या पाच वर्षात दरवर्षी किमान 11 विमानांचा अपघात झाल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट होतंय. मृत्यू झालेल्यांमध्ये 12 पायलट, 27 जवान आणि 7 एअर क्रू कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रत्येक अपघाताची चौकशी एक विभाग करत असतो. त्यांनी दिलेल्या सूचनांचीही अंमलबजावणी केली जाते. मात्र अपघात रोखणं हे एक मोठं आव्हान असल्याचंही नाईक यांनी सांगितलं.

Facebook, Instagram आणि Whatsapp झालं डाऊन

मानवी चूका, तांत्रिक बिघाड आणि इतर कारणांमुळे हे अपघात झाल्याचं पुढं आलंय. लढाऊ विमानांच्या पायलटला तयार करण्यासाठी कठोर मेहनत लागते. निष्णात पायलट जर मृत्यूमुखी पडला तर ती सर्वात मोठी हानी समजली जाते. कारण लढाऊ विमानं चालवायला विशेष कौशल्य आणि कसब लगात असतं.

भारत अमेरिकेकडून घेणार 10 बिलियनची शस्त्रास्त्र

देशाच्या सुरक्षेला आता सरकार प्राधान्य देत आहे. त्या दृष्टीनं भारतानं आता महत्त्वपूर्ण पावलं उचलली आहेत. भारत सरकार अमेरिकेकडून तब्बल 10 बिलियन अमेरिकी डॉलरची शस्त्र खरेदी करणार आहे. अमिरेकेसोबत खरेदी व्यवहार पूर्ण करण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह दौरा देखील करणार आहेत. यासाठी डीएसीची देखील स्थापना करण्यात आली आहे. डीएसीच्या अध्यक्षपदी राजनाथ सिंह असणार आहेत. दरम्यान, डीएसीनं कामाला सुरूवात केली असल्याची माहिती देखील समोर येत आहे.

तिवरे धरण फुटलं.. 12 मृतदेह शोधण्यात यश, 12 अद्याप बेपत्ता

खरेदीला सुरूवात

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतानं शस्त्रास्त्र खरेदीला सुरूवात देखील केली आहे. मागील आठवड्यामध्ये अमेरिकेनं आठ Long Range Petrol Aircraft P – 8च्या खरेदीवर शिक्कामोर्बत देखील केलं. यापूर्वी भारतानं याच श्रेणीतील विमानांची खरेदी केली आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये अमेरिका भारताकडे Long Range Petrol Aircraft P – 8 सोपवणार आहे. या श्रेणीतील विमानं ही अद्ययावत अशी आहेत. पाणबुडीला शोधून नष्ट करण्याची क्षमता देखील या विमानांमध्ये आहे. 12 पेक्षा जास्त विमानांची खरेदी करण्यात येणार आहे.

First published: July 3, 2019, 10:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading