325 दहशतवादी आणि 25 कमांडरचा भारतीय हवाई दलानं केला खात्मा!

पुलवामा हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना भारतानं चांगलाच धडा शिकवला आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 27, 2019 11:52 AM IST

325 दहशतवादी आणि 25 कमांडरचा  भारतीय हवाई दलानं केला खात्मा!

दिल्ली, 26 फेब्रुवारी : पुलवामा येथे 40 जवान शहीद झाल्यानंतर दहशतवाद्यांना भारतानं जन्माची अद्दल घडवली आहे. हल्लानंतर दहशतवाद्यांनी खूप मोठी चूक केली आहे याची किंमत त्यांना मोजावी लागेल असा इशारा भारतानं दिला होता. त्यानंतर भारतानं पाक व्याप्त काश्मीरमध्ये बालाकोट येथे कारवाई करत दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले. यामध्ये दहशतवादी संघटनांचे तब्बल 25 कमांडर आणि 325 पेक्षा  जास्त दहशतवादी ठार झाले.  उच्चपदस्थ सुत्रांनी याबाबतची माहिती दिली.  मिराज - 2000 या भारताच्या 12 विमानांनी पहाटे 3 वाजून 25 मिनिटांनी जोरदार हल्ला करत दहशतवाद्यांचा खात्मा केला.Loading...
या हल्ल्यामध्ये जैश ए मोहम्मदचा म्होरक्या अझर मसूदचा मेव्हणा युसूफ अझर ऊर्फ मोहम्मद सालीम देखील ठार झाल्याची शक्यता आहे. कारण, बालाकोटध्ये भारतीय हवाई दलानं केलेल्या कारवाईमध्ये जैश ए मोहम्मदसह अनेक दहशतवादी संघटनांचे लॉचिंग पॅड उद्धवस्त केले. यातील जैशच्या तळाची जबाबदारी ही युसूफ अझर ऊर्फ मोहम्मद सालीमकडे होती. हल्ल्यावेळी युसूफ अझर ऊर्फ मोहम्मद सालीम हा तळावर होता अशी माहिती आहे.
सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूँगा - मोदींची प्रतिक्रिया


भारतानं उभारला वॉर रूम

दहशतवादांचे तळ असलेला हा भाग खैबर पख्तून या भागामध्ये येतो. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये हा भाग येत असल्यानं खान यांना याबद्दल काहीही कसं माहिती नाही? असा सवाल आता निर्माण झाला आहे. मानवी वस्तीपासून लांब जंगलामध्ये दहशतवाद्यांचे सुसज्ज असे कॅम्प आहेत. कारवाई यशस्वीपणे पार पाडण्यासाठी भारतानं वॉर रूमची स्थापना केली होती.

पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला दहशतवाद्यांवर कारवाईसाठी 10 दिवसांचा वेळ दिला होता. पण, पाकिस्ताननं मात्र आश्वासनं आणि दर्पोक्ती करण्यापलिकडे काहीच केलं नाही. अखेर भारतानं एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांचा खात्मा केला.

'राफेल' असतं तर?

मिराज - 2000 या विमानांनी एलओसीपासून 80 किमी आतमध्ये घुसून ही कारवाई केली. पण, राफेल विमान असतं तर 150 किमी अगोदरच हल्ला केला गेला असता.

काय म्हणाले पाकचे परराष्ट्र मंत्री?

परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी एअर स्ट्राईकनंतर पत्रकार परिषद घेत भारतानं केलेल्या कारवाईची माहिती दिली. त्यानंतर आता पाकिस्तानकडून पहिली प्रतिक्रिया आली असून आम्हालाही स्वसंरक्षण, प्रतिकार करण्याचा अधिकार आहे. भारताच्या हल्ल्याला आम्ही देखील प्रत्युत्तर देणार अशी प्रतिक्रिया पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री मेहमुद कुरेशी यांनी दिली. यावेळी पाकिस्तानच्या संसदेमध्ये 'इम्रान खान शेम शेम' अशा घोषणा देखील देण्यात आल्या.

IndiaStrikeBack : परराष्ट्र सचिवांची UNCUT पत्रकार परिषद


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 26, 2019 02:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...