लष्कराची ऐतिहासिक पत्रकार परिषद, पाकिस्तानची पोलखोल

लष्कराची ऐतिहासिक पत्रकार परिषद, पाकिस्तानची पोलखोल

'भारतीय लष्कराने केलेल्या पाकिस्तानातल्या कारवाईचे पुरावे सरकारकडे सोपविले आहेत.'

  • Share this:

नवी दिल्ली 28 फेब्रुवारी : दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडीनंतर तीनही दलांच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. पाकिस्तानने खोटी माहिती दिल्याचा आरोप या अधिकाऱ्यांनी केला. पाकिस्तानी लढाऊ विमानांच लक्ष्य हे भारतीय लष्कराची ठिकाणं होतं असं ते म्हणाले. पाकिस्तानची अनेक विमाने भारतीय हद्दीद घुसली होती. जम्मू आणि काश्मीरच्या तीन भागांमध्ये ही विमाने आली होती मात्र भारतीय लढाऊ विमानांनी त्यांना पिटाळून लावलं. एअर व्हॉईस मार्शल आर.जी.के. कपूर, मेजर जनरल सुरेंद्र सिंग महल आणि नौदलाचे रिअर अॅडमीरल डी.एस. गुजराल यांनी पत्रकारांना माहिती दिली.


गेल्या  काही दिवसांपासून पाकिस्तानने 35 पेक्षा जास्त वेळी शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं असंही या अधिकाऱ्यांनी सांगितलं. पाकिस्तानच्या F-16 या विमानाचे तुकडे भारताला मिळाले असल्याची माहिती त्यांनी दिली.  भारतीय लष्कराने केलेल्या पाकिस्तानातल्या कारवाईचे पुरावे सरकारकडे सोपविले आहेत ते केव्हा आणि कसे दाखवायचे याचा निर्णय हा  राजकीय नेतृत्वाने घ्यायला आहे अस मतही या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलं.पाकिस्तानचा दहशतवाद्यांना जोपर्यंत पाठिंबा राहिल तोपर्यंत भारत कारवाई करायला स्वतंत्र आहे असंही या अधिकाऱ्यांनी सांगितलं. या पत्रकार परिषदेत पाकिस्तानच्या हल्ल्याचे पुरावेही पत्रकारांना दाखविण्यात आले.

विंग कमांड़र अभिनंदन यांची सुटका करण्याचा निर्णय हा सदिच्छेचं प्रतिक असला तरी अभिनंदन भारतात परत आल्यावरच त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करू असंही या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्याच्या ताब्यात असलेला विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांची शुक्रवारी सुटका करणार असल्याचं जाहीर केल्यामुळे परिस्थिती बदलली आहे. त्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद महत्त्वाची मानली जात आहे.अमेरिकेचे प्रयत्न

भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणाव आहे. हा तणाव कमी व्हावा यासाठी पडद्याच्या मागे मोठ्या घडामोडी घडत आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तसे संकेत दिले आहेत. दोन्ही देशांमधला तणाव लवकरच कमी होईल आणि परिस्थिती पूर्वपदावर येईल असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

ट्रम्प म्हणाले, ''अमेरिकेकडे बऱ्यापैकी चांगली बातमी आहे. दोघांमध्ये सध्या तणाव आहे आणि आम्ही मध्यस्थी करून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतोय. तणाव लवकरच निवळेल अशी मला आशा आहे.  हा तणाव दशकानुदशकं सुरू आहे. दुर्दैवानं दोघांना एकमेकांविषयी प्रचंड तिरस्कार आहे. म्हणून आम्ही दोघांना मदत करण्यासाठी मध्यस्थीचा प्रयत्न करतोय. जेणेकरून शांतता नांदेल, आणि मला आशा आहे तणाव लवकरच निवळेल.''आज काय झालं?

गुरुवारी सकाळी तीन सेनादलांच्या प्रमुखांनी पंतप्रधानांना घटनेची माहिती दिली.

संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांनीही सेना दलांच्या प्रमुखांसोबत चर्चा केली.

दुपारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अभिनंदनची सुटका करणार असल्याचं जाहीर केलं

VIDEO : भारतीय तिन्ही दलाच्या प्रमुखांची UNCUT पत्रकार परिषद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 28, 2019 07:11 PM IST

ताज्या बातम्या