News18 Lokmat

...म्हणून पाकिस्तान रडारला भारतीय जेट आल्याचं कळलंच नाही, जनरल डी.एस. हुड्डांनी सांगितलं कारण

CNN-News18 ला दिलेल्या मुलाखतीत हुड्डा म्हणाले की, पुलवामा हल्ल्यानंतर जे झालं त्याची परतफेड करणं गरजेचं होतं.

News18 Lokmat | Updated On: Feb 26, 2019 06:10 PM IST

...म्हणून पाकिस्तान रडारला भारतीय जेट आल्याचं कळलंच नाही, जनरल डी.एस. हुड्डांनी सांगितलं कारण

नवी दिल्ली, २६ फेब्रुवारी २०१९- लेफ्टनंट जनरल डीएस हुड्डा यांनी पाक व्याप्त पाकिस्तानमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकसाठी भारत सरकारचे अभिनंदन केले. २०१६ मध्ये भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचे ते प्रणेते होते. मंगळवारी पहाटे ३.३० वाजता इंटेलीजन्सच्या मदतीने भारतीय वायु दलाच्या १२ मिराज २००० जेट विमानांनी बालाकोट, मुझफ्फराबाद आणि चकोटी येथे १ हजार किलो वजनाचे बॉम्ब हल्ले केले.

परराष्ट्र सचिव विजय गोखले म्हणाले की, या हल्ल्यात मोठ्या संख्येने जैश-ए-मोहम्मचे दहशतवादी, ट्रेनर, वरिष्ठ कमांडर यांना आत्मघातकी हल्ल्यासाठी इथे प्रशिक्षण दिलं जायचं. सीएमएम-न्यूज18 ला दिलेल्या मुलाखतीत हुड्डा म्हणाले की, पुलवामा हल्ल्यानंतर जे झालं त्याची परतफेड करणं गरजेचं होतं.

या एअर स्ट्राइकने पाकिस्तानला योग्य तो संदेश गेला की भारत याहून जास्त सहन करणार नाही ते म्हणाले की, ‘हे एअर स्ट्राइक पूर्णपणे प्रोफेशनल होतं. याशिवाय विशेष मार्ग वापरण्यामुळे आणि उच्च क्षमता असलेल्या जॅमरचा वापर केल्यामुळे हे एअर स्ट्राइक यशस्वी झालं आणि पाकिस्तानच्या रडारमध्ये भारतीय जेट विमान आले नाहीत. भारतीय वायुसेना ही पाकिस्तानी सेनेपेक्षा तांत्रिकदृष्ट्या खूप पुढे आहे.’

हुड्डाने म्हणाले की, भारतावर हल्ला करणाऱ्यांनी भारत पलटवार करणार नाही असा विचार कधीही करू नये. २०१६ मध्ये झालेल्या उरी हल्ल्यानंतर असे हल्ले अजून होण्याची गरज होती. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी कॅम्प आहेत.

जैश-ए-मोहम्मदचं केंद्र असलेल्या बहावलपुरमध्ये हल्ला का केला गेला नाही असा प्रश्न जेव्हा त्यांना विचारण्यात आला तेव्हा हुड्डा म्हणाले की, या हल्ल्यात इतर नागरिकांचा प्राण जाण्याची शक्यता होती. यामुळे इथे हल्ला करण्याचा विचार केला गेला नाही.

Loading...

पत्रकार परिषदेत परराष्ट्र सचिव म्हणाले की, ‘आम्ही जे टारगेट निवडले होते त्याचा मूळ हेतू नागरिकांना कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये हा होता. जिथे एअर स्ट्राइक केलं गेलं तो डोंगराळ परिसरात वरचा भाग आहे.’ पाकिस्तानकडून आता प्रत्युत्तर दिलं जाईल या प्रश्नाचं उत्तर देताना हुड्डा म्हणाले की, सध्या भारत सर्व परिस्थितींसाठी तयार आहेत.

IndiaStrikeBack : 'वंदे मातरम'च्या जयघोषानं दणाणलं भोसला मिल्ट्री स्कूल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 26, 2019 05:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...