आग्रा एक्सप्रेस वेवर उतरली वायुदलाची विमानं

आग्रा एक्सप्रेस वेवर उतरली वायुदलाची विमानं

उत्तर प्रदेशातील आग्रा-लखनौ एक्सप्रेस वे आज रनवे बनलं. कारण भारतीय वायू दलाचे एक दोन नव्हे तर चक्क १६ लढाऊ विमानांनी या एक्सप्रेस हायवेवर टच डाउन आॅपरेशन केलं.

  • Share this:

24 आॅक्टोबर : उत्तर प्रदेशातील आग्रा-लखनौ एक्सप्रेस वे आज रनवे बनलं. कारण भारतीय वायू दलाचे एक दोन नव्हे तर चक्क १६ लढाऊ विमानांनी या एक्सप्रेस हायवेवर टच डाउन आॅपरेशन केलं. सकाळी १०च्या सुमारास वायुदलाचं हे ऑपरेशन सरू झालं. वायुदलाचे ६ सुखोई, ३ जॅग्वार, ६ मिराज, आणि एक सी १३० हे मालवाहतूक करणारे विमान गरूड कमांडोंना या एक्सप्रेस वेवर उतरवलं.

वायुदलाचे हे टचडाउन ऑपरेशन सुरू झालं ते सी १३० या मालवाहतूक विमानातून गरूड कमांडोंना या एक्सप्रेस वेवर उतरवून. त्यानंतर सुखाँय, जॅग्वार आणि मिराज या लढाऊ विमानांनी एक्सप्रेस हायवेवर टच डाऊन केलं. त्यानंतर शेवटी सी १३० मालवाहतूक विमान उतरवलेल्या गरूड कमांडोंना पुन्हा विमानात घेऊन आकाशात झेप घेतली. वायुदलाच्या या ऑपरेशनमुळे युद्धजन्य परिस्थितीत नागरी हायवे वायुदलासाठी रनवे म्हणून कशी वापरता येतील, यासाठी एक कवायत आहे.

लखनौपासून ६५ किमी अंतरावर असलेल्या बांगरमाऊ गावाजवळ ही विमानं उतरली. हे गाव उन्नाव जिल्ह्यात येतं. युद्ध किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे हवाई तळ उद्ध्वस्त झाला, तर पर्यायी व्यवस्था असावी, हा यामागचा विचार. २०१६ सालीही यमुना एक्सप्रेस वेवर मिराज विमान याच एक्सप्रेस उतरलं होतं.

First published: October 24, 2017, 10:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading