EXCLUSIVE : मसूद अझरच्या भावानंच दिला हवाई हल्ल्याचा कबुलीनामा

भारतानं एअर स्ट्राईक करत जैशचे कॅम्प उद्धवस्त केल्याची कबुली आता अझहरच्या भावानं दिली आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 2, 2019 08:09 PM IST

EXCLUSIVE : मसूद अझरच्या भावानंच दिला हवाई हल्ल्याचा कबुलीनामा

नवी दिल्ली, 2 मार्च : भारताच्या एअर स्ट्राईकचा काहीही फायदा झाला नाही.आम्ही त्यांना पळवून लावलं, अशा वल्गना करणारा पाकिस्तान आता चांगलाच तोंडावर आपटला आहे. कारण, भारताच्या कारवाईमध्ये जैश ए मोहम्मदचा कॅम्प उद्धवस्त झाल्याची कबुली मसूद अझहरचा भाऊ मोहम्मद अम्मारनं दिली आहे. मोहम्मदची ही कबुली म्हणजे भारतानं केलेली कारवाई यशस्वी झाल्याचा पुरावाच आहे. एअर स्ट्राईकमध्ये भारतानं 200 ते 300 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती समोर आली होती. पाकिस्ताननं मात्र यामध्ये काहीच नुकसान झालं नाही असं म्हटलं होतं.


हेही वाचा - '35 दहशतवाद्यांचे शव आम्ही पाहिले, पाक सैन्यानं हिसकावले लोकांचे मोबाइल'

भारतीय हवाई दलाच्या मिराज - 2000 या विमानांनी 26 फेब्रुवारीला पहाटे 3 वाजून 20 मिनिटांनी पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून तब्बल 21 मिनिटं दहशतवाद्यांच्या कॅम्पवर बॉम्ब हल्ला चढवला होता. यामध्ये दहशतवाद्यांचं मोठं नुकसान झालं आहे.


Loading...

मसूदवर पाकिस्तानात उपचार

‘जैश ए मोहम्मद’चा म्होरक्या मसूद अझर आजारी आहे आणि घराबाहेरही पडू शकत नाही, असं वक्तव्य पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मोहम्मद कुरेशी केलं होतं.

पण, मसूद अझर पाकिस्तानमध्ये रावळपिंडीत लष्कराच्या रुग्णालयात उपचार घेतोय. याच रावळपिंडीमध्ये पाकिस्तानी लष्कराचं मुख्यालय आहे. मसूद अझरला मूत्रपिंडाचा विकार आहे. त्यामुळे त्याला डायलिसिस वर ठेवण्यात आलंय, असं पाकिस्तानमधल्या सुरक्षा अधिकाऱ्यांनीच सांगितलं. पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी याच मसूद अझरच्या जैश ए मोहम्मद या संघटनेने घेतली आहे. मसूद अझर याआधी ओसामा बिन लादेनचा जवळचा सहकारी होता. त्याने अनेक देशांमध्ये दहशतवादी कारवाया घडवून आणल्या आहेत. त्यासोबतच त्याने युरोपमधल्या मशिदींमध्येही जिहाद सुरू केला.

कंदहार अपहरण प्रकरणात मसूदची सुटका झाल्यानंतर ओसामा बिन लादेनने त्याच रात्री त्याच्यासाठी पार्टी ठेवली होती. मी आणि मसूद अझरने 1993 मध्ये पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं, असंही लादेनने त्यात सांगितलं होतं.


एका क्षणात होत्याचं झालं नव्हतं, भूस्खलनाचा थरारक VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 2, 2019 07:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...