तुम्हाला माहीत आहे का ISROच्या गगनयान मोहीमेबद्दल? नौदलाने पूर्ण केला पहिला टप्पा!

तुम्हाला माहीत आहे का ISROच्या  गगनयान मोहीमेबद्दल? नौदलाने पूर्ण केला पहिला टप्पा!

चांद्रयान 2नंतर आता isroने पुढील मोहीमेसाठी युद्धपातळीवर तयारी सुरु केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 08 सप्टेंबर : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो (isro)च्या चांद्रयान 2 मोहीमेला पूर्ण यश आले नसले तरी संपूर्ण जगातून त्यांचे कौतुक होत आहे. चांद्रयान 2नंतर आता isroने पुढील मोहीमेसाठी युद्धपातळीवर तयारी सुरु केली आहे. गगनयान (Gaganyaan) ही इस्रोची पुढील मोहीम आहे. 2022साली या मोहीमेतून 3 अंतराळवीर अंतराळात जाणार आहेत. जाणून घेऊयात इस्रोच्या या आणखी एका महत्त्वांकांक्षी मोहीमेबद्दल...

पहिल्या गगनयान मोहीमेसाठी 2022 हे वर्ष निश्चित करण्यात आले आहे. या मोहीमेत भारत प्रथमच अंतराळात अंतराळवीरांना पाठवणार आहे. अंतराळवीरांची निवड ही लष्करातील वैमानिकांमधून केली जाणार आहे. इस्रोमधील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार जगातील अन्य देश अशाच पद्धतीने पहिल्या मोहीमेसाठी टेस्ट पायलटची निवड करतात. यात महिला टेस्ट पायलटचा समावेश नाही. भारतीय हवाई दलाने (Indian Air Force) या महत्वाकांक्षी गगनयान मोहीमेसाठी अंतराळवीरांच्या निवडीची पहिली प्रक्रिया पूर्ण केली आहे. संबंधित टेस्ट पायलटांची शारीरीक तपासणी, लॅबमधील तपासणी, रेडिओलॉजिकल, क्लिनिक आणि मानसिक तपासणी करण्यात आली आहे.

हवाई दलातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक निवड प्रक्रियेत 25 टेस्ट पायलयांनी भाग घेतला होता. निवडीसाठी अद्याप अनेक टप्पे शिल्लक आहेत. सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर 2 -3 टेस्ट पायलटांची निवड केली जाणार आहे. यासंदर्भात हवाई दलाने केलेल्या ट्विटनुसार मिशन गगनयानसाठी भारतीय नौदलाने अंतराळवीरांच्या निवडीसाठी इस्टीट्यूट ऑफ एअरोस्पेसचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे. आता या सर्व टेस्ट पायलटांच्या विविध चाचण्या केल्या जाणार आहेत.

उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांनी प्रशिक्षणासाठी नोव्हेंबरनंतर रशियाला पाठवले जाणार आहे. भारताच्या या पहिल्या मानवरहित अंतराळमोहीम रशियातून प्रक्षेपित होणार आहे. अंतराळात मानव पाठवण्यासाठी रशिया भारताला मदत करणार आहे. गेल्याच वर्षी रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन भारत दौऱ्यावर आले असता तेव्हा गगनयान संदर्भात करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती.

अशी आहे गगनयान मोहीम...

गगनयान मोहीमेचे एकूण बजेट 10 हजार कोटी इतकी आहे. यात मोहीमेसाठी हार्डवेअर आणि आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. गेल्या 4 दशकात भारत-रशिया यांच्यात अंतराळ संशोधन सहकार्य आहे. 2015मध्ये दोन्ही देशांनी भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्टच्या प्रक्षेपणाचा 40वी वर्षपूर्ती साजरी केली होती.

कोल्हापूर महामार्गावर दरड कोसळण्याचा LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: isro
First Published: Sep 8, 2019 03:54 PM IST

ताज्या बातम्या