मुंबई, 13 जून : Indian Air Forceच्या AN-32 विमानातील क्रू मेंबरसह सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. शोध पथक सकाळी अपघातस्थळी पोहोचलं त्यानंतर ही माहिती देण्यात आली. 8 क्रू मेंबर आणि इतर 5 असे 13 जण या विमानातून प्रवास करत होते. दरम्यान Indian Air Forceनं सर्वांच्या कुटुंबियांना याबाबतची माहिती दिली आहे.
IAF search teams reached the AN-32 crash site today morning and did not find any survivors. The families of the 13 personnel have already been informed that there are no survivors. pic.twitter.com/7FZj0ugryk
3 जून रोजी Indian Air Forceचं AN-32 विमान बेपत्ता झालं होतं. त्यानंतर 8 दिवसानंतर म्हणजेच 11 जून रोजी विमानाचे अवशेष सापडले होते. सोमवारी, 3 जूनला हे विमान अरुणाचल प्रदेशमधून गायब झालं होतं. त्यानंतर बेपत्ता विमानाचा शोध घेण्यासाठी भारतीय हवाई दलाची हेलिकॉप्टर आणि विमानं तैनात करण्यात आली होती. अखेर 8 दिवसानंतर विमानाचा शोध लागला होता. विमानाचा शोध घेण्यासाठी स्थानिक लोकांची देखील मदत घेण्यात आली होती. 3 जून रोजी जोरहाट इथून या विमानानं दुपारी 12 वाजून 25 मिनिटांनी उड्डाण केलं. त्यानंतर मेंचुका अॅडव्हान्स लँडिंग ग्राउंडवर या विमानाचं लँडिंग होणं अपेक्षित होतं. पण, उड्डाणानंतर अर्ध्या तासात या विमानाचा जमिनीशी संपर्क तुटला. दुपारी 1 वाजता या विमानानं जमिनीवरच्या कक्षाशी संपर्क साधला होता. पण तो शेवटचा. त्यानंतर विमानाकडून कुठलाही संदेश किंवा संपर्क झालेला नव्हता. या विमानामध्ये 8 क्रू मेंबर आणि इतर 5 असे एकूण 13 प्रवासी होते.
Indian Air Force: Following air-warriors lost their life in the tragic #AN32Aircraft crash - GM Charles, H Vinod, R Thapa, A Tanwar, S Mohanty, MK Garg, KK Mishra, Anoop Kumar, Sherin, SK Singh, Pankaj, Putali & Rajesh Kumar. pic.twitter.com/dRTVznniEx
ज्यावेळी हे विमान बेपत्ता झालं ते विमान पायलट आशिष तन्वर चालवत होते. आशिष हरियाणामधल्या पलवलचे रहिवासी आहेत. त्यांची पत्नी संध्या याही हवाऊ दलाच्या एअर ट्रॅफिक कंट्रोल विभागात काम करतात.
ज्यावेळी आशिष यांच्या विमानाने अरुणाचल प्रदेशच्या दिशेने उड्डाण केलं त्यावेळी त्यांची पत्नी संध्या जोरहाटमध्ये ड्युटी करत होत्या. आशिष यांनी संध्या यांच्यासोबत 18 मे रोजी सुटी घालवली आणि ते कामावर रुजू झाले. संध्या यांच्याकडे आता त्यांच्या पतीच्या याच आठवणी उरल्या आहेत.
Big Boss मराठीच्या घरात होणार सलमानची एन्ट्री? ऐका काय म्हणाला भाईजान