नवी दिल्ली, 18 जून : भारतीय हवाई दलाचं दुर्घटनाग्रस्त विमान AN-32चा ब्लॅक बॉक्स सापडला आहे. पण, अपघाताचं कारण कळण्यासाठी ब्लॅक बॉक्समधील डेटा रिकव्हरीसाठी वेळ लागणार आहे. 3 जूनला Indian Air Forceच्या AN-32 विमानाला अपघात झाला होता. यामध्ये क्रू मेंबरसह 13 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर 8 दिवसांनी म्हणजेच 13 जूनला विमानाचे अवशेष सापडले होते. दरम्यान, सुरक्षा दलाच्या सुत्रांनी 3 दिवसांपूर्वी अपघातस्थळावरून ब्लॅक बॉक्स बाहेर आणला गेला. या बॉक्समधून डेटा रिकव्हरीचं काम सुरू आहे. गरज पडल्यास बॉक्स दुसऱ्या एजन्सीकडे सोपवला जाईल अशी माहिती दिली.
विमानाला झाला होता अपघात
3 जूनला हे विमान अरुणाचल प्रदेशमधून गायब झालं होतं. त्यानंतर बेपत्ता विमानाचा शोध घेण्यासाठी भारतीय हवाई दलाची हेलिकॉप्टर आणि विमानं तैनात करण्यात आली होती. अखेर 8 दिवसानंतर विमानाचा शोध लागला होता. विमानाचा शोध घेण्यासाठी स्थानिक लोकांची देखील मदत घेण्यात आली होती. 3 जून रोजी जोरहाट इथून या विमानानं दुपारी 12 वाजून 25 मिनिटांनी उड्डाण केलं. त्यानंतर मेंचुका अॅडव्हान्स लँडिंग ग्राउंडवर या विमानाचं लँडिंग होणं अपेक्षित होतं. पण, उड्डाणानंतर अर्ध्या तासात या विमानाचा जमिनीशी संपर्क तुटला. दुपारी 1 वाजता या विमानानं जमिनीवरच्या कक्षाशी संपर्क साधला होता. पण तो शेवटचा. त्यानंतर विमानाकडून कुठलाही संदेश किंवा संपर्क झालेला नव्हता. या विमानामध्ये 8 क्रू मेंबर आणि इतर 5 असे एकूण 13 प्रवासी होते.
दुर्दैवी योगायोग
ज्यावेळी हे विमान बेपत्ता झालं ते विमान पायलट आशिष तन्वर चालवत होते. आशिष हरियाणामधल्या पलवलचे रहिवासी आहेत. त्यांची पत्नी संध्या हवाई दलाच्या एअर ट्रॅफिक कंट्रोल विभागात काम करतात.
ज्यावेळी आशिष यांच्या विमानाने अरुणाचल प्रदेशच्या दिशेने उड्डाण केलं त्यावेळी त्यांची पत्नी संध्या जोरहाटमध्ये ड्युटी करत होत्या. आशिष यांनी संध्या यांच्यासोबत 18 मे रोजी सुटी घालवली आणि ते कामावर रुजू झाले.
VIDEO : नवी मुंबईत शाळेजवळ आढळली बाँब सदृश वस्तू