नवी दिल्ली, 16 एप्रिल : कोरोना व्हायरसचा (coronavirus) प्रसार रोखण्यासाठी 25 मार्चपासून 21 दिवस लॉकडाऊन -0.1 लावण्यात आला. मात्र तरी कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे, मग या लॉकडाऊनचा काय फायदा झाला असा प्रश्न लॉकडाऊनमुळे त्रस्त झालेल्या प्रत्येकाला पडला आहे आणि त्याचं उत्तर आता मिळालं आहे.
लॉकडाऊन -0.1 मुळे कोरोनाव्हायरसवर नियंत्रण मिळवणाऱ्या देशांमध्ये भारत अव्वल आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि वर्ल्डमीटर्सने ही आकडेवारी जारी केली आहे.
कोरोनाव्हायरस रुग्णांची संख्या दुपटीने वाढून 12,000 चा टप्पा ओलांडायला भारताला 6 दिवस लागले. तर इतर देशांनी हा आकडा 5 दिवसांच्या आतच ओलांडला.
ठणठणीत बऱ्या झालेल्या कोरोनारुग्णांचं रक्त करणार अत्यवस्थ रुग्णांवर उपचार
यूएस आणि जर्मनीत फक्त 2 दिवसातच रुग्णांची संख्या दुप्पट होऊन 12000 पार गेली तर इटली, यूकेत 3 आणि स्पेन, फ्रान्समध्ये 4 दिवसांतच रुग्णांमध्ये दुप्पट वाढ होऊन आकडा 12000 च्या वर गेला.
भारत हा दाट लोकवस्ती असलेला देश आहे, तरीही इतर देशांच्या तुलनेत प्रति 1 दशलक्ष लोकसंख्येमागे कोरोनाची प्रकरणं आणि मृत्यूचं प्रमाण भारतात सर्वात कमी आहे. 1 दशलक्ष लोकसंख्येमागे भारतात 9 प्रकरणं तर मृत्युदर 0.3 आहे. भारतानंतर ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या देशांनीही कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवलं आहे.
6 महिन्यांच्या चिमुकल्यापासून 81 वर्षांच्या आजीबाईंपर्यंत कोरोनाशी यशस्वी लढा
कोरोनाच्या लढाईत भारताने अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला, तसंच इतर देशांनाही मागे टाकलं आहे. या आकडेवारीवरून दिसून येतं आहे की, भारतातील लॉकडाऊन - 1.0 किती यशस्वी ठरला आहे. त्यामुळे आता 3 मेपर्यंत असलेला लॉकडाऊन - 1.0 चं पालन करणं ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे.
संकलन, संपादन - प्रिया लाड
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona