मोदी सरकारचा पाकिस्तानला तिसरा धक्का, रावी नदीचं पाणी रोखणार!

मोदी सरकारचा पाकिस्तानला तिसरा धक्का, रावी नदीचं पाणी रोखणार!

मोदी सरकारनं पाकिस्तानला तिसरा आणि मोठा धक्का दिला आहे.

  • Share this:

बागपत,21 फेब्रुवारी : पुलवामा हल्ल्यानंतर आता भारतानं पाकिस्तानला एक-एक झटका द्यायला सुरूवात केली आहे. यापूर्वीच भारतानं पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेतला. शिवाय, पाकिस्तानी वस्तुंवर 200 टक्के आयात शुल्क देखील लावले. या दोन धक्क्यातून पाकिस्तान सावरत नाही तोवर आता पाकिस्तानला आता तिसरा धक्का दिला आहे.

मोदी सरकारनं आता रावी नदीवरील पाणी रोखण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शाबपूर - कांडी याठिकाणी धरणाच्या कामाला सुरूवात देखील झाली आहे. या प्रोजेक्टला नॅशन प्रोजेक्ट म्हणून देखील घोषित करण्यात आलं आहे. मोदी सरकारनं रोखलेलं पाणी आता जम्मू - काश्मीर आणि पंजाबकडे वळवण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवरून याबद्दलची माहिती दिली आहे.

">

 

">

 

">

काय आहे भारत - पाकिस्तानचा पाणी वाद?

19 सप्टेंबर 1960 या दिवशी भारत - पाकिस्तानमध्ये सिंधु जलवाटप करार झाला. या करारनुसार भारतातून पाकिस्तानमध्ये जाणाऱ्या सहा नद्यांच्या पाणी वाटपावर निर्णय घेतला गेला. सिंधु, झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज या त्या नद्या होय. सिंधु, झेलम, चिनाब पूर्वेकडील आणि रावी, बियास आणि सतलज पश्चिमेकडली नद्या. करारनुसार पूर्वेकडील नद्यांवर भारताचा पूर्ण अधिकार राहिल तर पश्चिमेकडील नद्यांचं पाणी हे पाकिस्तानला सोडावं लागेल.

अर्थात रावी, बियास आणि सतलज या नद्यांचं पाणी भारत विज निर्मितीसाठी वापरू शकतो. पण, शेतीसाठी वापरू शकत नाही. म्हणजेच काय तर भारताला रावी, बियास आणि सतलज या नद्यांचं पाणी वापरून पुन्हा नदीत सोडायचं आहे.

करारामुळे पाकिस्तानचा फायदा

या करारमुळे पाकिस्तनचाच फायदा झाला आहे. कारण सहा नद्यांचा विचार करता पाकिस्तानला 80 टक्के पाणी मिळतं. तर भारताला केवळ 20 टक्के. त्यामुळे नद्यांवरती धरणं बांधून पाणी रोखल्यास त्याचे परिणाम हे पाकिस्तानला भोगावे लागतील.

या साऱ्या बाबी जरी असल्या तरी त्यासाठी काही काळ जावा लागेल. त्यासाठी आज पावलं उचलल्यास काही काळानंतर मात्र त्याचे परिणाम हे दिसून येतील.

VIDEO: भर रस्त्यात क्रेनने घेतला पेट, मुंबईकडे येणारी वाहतूक बंद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 21, 2019 06:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading