चीनला भरणार धडकी, राफेल नंतर भारत रशियाकडून घेणार ‘ही’ अत्याधुनिक 33 लढाऊ विमानं!

चीनला भरणार धडकी, राफेल नंतर भारत रशियाकडून घेणार ‘ही’ अत्याधुनिक 33 लढाऊ विमानं!

चीनच्या तुलनेत भारताच्या लढाऊ ताफ्यात नव्या विमानांची मोठी गरज आहे. चीनचा विरोध असतानाही रशिया भारताला संरक्षण सामुग्री द्यायला तयार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 2 जुलै: भारत आणि चीनदरम्यान सीमा विवाद (Indi China Border Dispute) सुरू असतानाच भारताने आपली संरक्षण क्षमता वाढविण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. भारत आणि रशियाकडून (india and Russia) अत्याधुनिक MIG-29 ही विमानं खरेदी करणार आहे. त्यासाठी प्रस्तावही तयार करण्यात आल्याची माहिती दिली जात आहे. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने रशियाकडून 12 एसयू-30 आणि 21 मिग-29 या श्रेणींची सुधारणांसह 33 नवीन लढाऊ विमाने घेणार आहे. संरक्षण मंत्रालयाने या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. ही खेरदी एकूण 18 हजार 148 कोटींची असेल अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंग हे नुकतेच रशियाच्या दौऱ्यावर गेले होते. त्या भेटीत त्यांनी या खेरदीविषयी बोलणी केली होती. सध्याचे धोके बघता भारताला हवाई दल आणखी मजबूत करण्याची गरज आहे. त्याचाच एक भाग म्हणून सरकारने एक मोठी योजना तयार केली होती. त्यानुसार ही खरेदी होत आहे.

रशिया हा भारताचा सर्वात मोठा संरक्षण सामुग्री पुरवठादार देश आहे. शितयुद्धाच्या काळात रशिया हा कायम भारताच्या पाठिशी उभा राहिला आहे. त्यामुळे चीनचा विरोध असतानाही रशिया भारताला संरक्षण सामुग्री द्यायला तयार आहे. या आधी भारताने फ्रान्सकडून राफेल ही लढाऊ विमाने खरेदी केली होती.

VIDEO : कोरोनामुळे झाला मृत्यू, दफनासाठी 500 मीटर खेचत नेला मृतदेह

भारताकडे सध्या मिग-29 ही विमानं आहेत. मात्र ती आता जुनी झाली आहेत. त्यांच्या अपघाताचं प्रमाणही वाढलेलं आहे. नवी विमानं अपग्रेडेड असून ती अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज आहेत. या विमानांमुळे भारताची संरक्षण सिद्धता वाढणार असून चीनलाही कुठलाही निर्णय घेतांना दहा वेळा विचार रावा लागणार आहे.

VIDEO : लाइटवरून झालेल्या वादातून कात्रीनं तरुणावर केले सपासप वार

चीनच्या तुलनेत भारताच्या लढाऊ ताफ्यात नव्या विमानांची मोठी गरज आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी तातडीने विमाने घेण्याची गरज आहे. मात्र संरक्षण खरेदीची प्रक्रिया ही दीर्घकाळ चालणारी आणि वेळखाऊ असल्याने ही विमाने नेमकी केव्हा येणार  याबाद्दल उत्सुकता कायम आहे.

 

First published: July 2, 2020, 5:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading