नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर : चारही बाजूंनी भारताच्या सीमा बळकट करण्यासाठी प्रयत्न कायम केले जातात. भारताचे लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या उपस्थितीत भारतीय बनावटीच्या पाणबुडीविरोधी आयएनएस कवरत्ती या युद्धनौकेचा भारतीय नौदलात समावेश करण्यात आला. विशाखापट्टणममध्ये हा कार्यक्रम झाला. नौदलाच्या डायरेक्टरेट ऑफ नेव्हल डिझाइनने या स्वदेशी युद्धनौकेचं डिझाइन तयार केलं आहे. कोलकत्यातील गार्डन रिच शिपबिल्डिंग अँड इंजिनीअर्सने या जहाजाची बांधणी केली आहे.
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेलं हे एक महत्त्वाचं पाऊल मानलं जातंय. ही युद्धनौका नौदलात सामील झाल्याने नौसेनचं बळ वाढणार आहे. या युद्धनौकेत आधुनिक शस्रास्र यंत्रणा आणि असे सेन्सर बसवलेत जे पाणबुडीचं ठिकाण शोधून काढतात. त्यामुळे त्यांचा पाठलाग करता येणं सोपं होतं. प्रोजेक्ट 28 अंतर्गत भारतात बनवण्यात येणाऱ्या शेवटच्या चार युद्धनौकांपैकी INS कवरत्ती ही नौका आहे. या प्रकल्पातील तीन युद्धनौकांचा याआधीच नौदलात समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.
हे ही वाचा-भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत सरकारचा महत्त्वाचा निर्णय, बॉल BCCIच्या कोर्टात
Indian Army Chief General MM Naravane to commission the last of four indigenously built Anti-Submarine Warfare (ASW) stealth corvettes INS Kavaratti (in file photo) under Project 28 in Vishakhapatnam tomorrow. pic.twitter.com/eUc1VhLxOF
— ANI (@ANI) October 21, 2020
ही आहेत वैशिष्ट्य
पाणबुडीरोनासोबतच या युद्धनौकेत स्वत: चा बचाव करणारी एक जबरदस्त यंत्रणाही बसवण्यात आली आहे आणि लांब पल्ल्याच्या अभियानांवर जातानाही ही युद्धनौका फायद्याची ठरणार आहे.
या युद्धनौकेत वापरलेली 90 टक्के उपकरणं स्वदेशी म्हणजे भारतीय बनावटीची आहे.
याच्या सुपरस्ट्रक्चरसाठी कार्बन काँपोझिट वापरले असून तसा वापर करणं ही भारतीय युद्धनौका बांधणीच्या इतिहासातील मोठं यश आहे.
ही युद्धनौका अणू, रासायनिक आणि जैविक युद्धस्थितीतही काम करेल.
INS कवरत्तीची लांबी 109 मीटर आणि रूंदी 12.8 मीटर आहे. अत्याधुनिक शस्रास्र, रॉकेट लाँचर्स, हेलिकॉप्टर्स आणि सेन्सने ही नौका सज्ज आहे.