मसूद अझहर जागतिक दहशतवादी म्हणून घोषित होण्याची शक्यता

दहशतवादाच्या मुद्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला मोठं यश मिळू शकते.

दहशतवादाच्या मुद्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला मोठं यश मिळू शकते.

  • Share this:
    नवी दिल्ली, 30 एप्रिल : दहशतवादाच्या मुद्यावर भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठं यश मिळू शकते. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी भारत सातत्यानं प्रयत्न करत आहे. भारताला फ्रान्स, अमेरिका आणि इंग्लंडनं पाठिंबा देखील दिला. पण, चीननं मात्र नकाराधिकार वापरल्यानं भारताच्या प्रयत्नांना खीळ बसली होती. पण, आता 1 मे पर्यंत चीन आपला निर्णय बदलू शकते. त्यामुळे मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या मार्गातील अडथळा दूर होऊ शकतो. यापूर्वी देखील अनेकवेळा चीननं नकाराधिकार वापरल्यानं भारताला यश मिळत नव्हतं. पण, पुलवामा हल्ल्यानंतर मात्र भारत पूर्ण ताकदीनीशी मैदानात उतरला. शिवाय, चीनचं मन वळवण्याकरता फ्रान्स, अमेरिका आणि इंग्लंडनं देखील प्रयत्न केलं. मसूद आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित झाल्यास भारताच्या मुत्सदेगिरीला मिळालेलं मोठं यश असेल. 'हिंदुस्थान टाईम्स'ला एका अधिकाऱ्यानं नाव न छापण्याच्या अटीवर सर्व माहिती दिली आहे. ‘ATS प्रमुख म्हणून हेमंत करकरेंची भूमिका अयोग्य’, आता सुमित्रा महाजनांचं वादग्रस्त विधान पाकिस्तान म्हणतो, आमच्या देशात दहशतवादी आहेत पाकिस्तानमध्ये दहशतवादी आणि कट्टरतावादी असल्याची कबूली पाकिस्तानी लष्कराने दिली आहे. असे लोक देशात आहेत आणि त्यांच्या विरुद्ध खूप काही करण्यासारखं आहे असं मत पाकिस्तानाची लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल हसन गफूर यांनी व्यक्त केलंय. पाकिस्तानी लष्करानेच हे मत व्यक्त केल्यान भारताच्या दाव्याला आणखी बळकटी मिळाली आहे. पाकिस्तानमध्ये दहशतवादाला खतपाणी घातलं जातं असा भारत कायम आरोप करत असतो. मात्र प्रत्येक वेळी पाकिस्तानकडून त्याचा इन्कार केला जातो. जोपर्यंत दहशतवादाला पाकिस्तान खतपाणी घालत आहे तोपर्यंत चर्चा करणार नाही अशी ठाम भूमिका भारताने घेतली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर परिस्थिती बदलल्याने पाकिस्तानवर जगभरातून दबाव निर्माण झालाय. दहशतवादांविरुद्ध ठोस कारवाई करा अन्यथा परिणाम भोगण्यास तयार राहा असा इशाराही अमेरिकेने दिला होता. या दबावानंतर पाकिस्तानने जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेविरुद्ध कारवाई केली. मात्र ही कारवाई ही निव्वळ धुळफेक असल्याची टीका भारताने केली होती. VIDEO: यवतमाळ महामार्गावर ट्रक-क्रूझरची धडक, नववधूसह 3 जणांचा मृत्यू
    First published: