भारत- पाक तणाव अजून संपलेला नाही; आता भारतीय रेल्वेनं उचललं हे मोठं पाऊल

4 मार्चपासून समझौता एक्सप्रेस कायमस्वरूपी बंद होण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याची माहिती पीटीआयनं दिली आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 28, 2019 09:40 PM IST

भारत- पाक तणाव अजून संपलेला नाही; आता भारतीय रेल्वेनं उचललं हे मोठं पाऊल

दिल्ली, 28 फेब्रुवारी : भारत - पाकिस्तान वादानंतर आता भारतानं समझौता एक्सप्रेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 4 मार्चपासून समझौता एक्सप्रेस कायमस्वरूपी बंद होण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याची माहिती पीटीआयनं दिली आहे. आज पाकिस्ताननं अटारीजवळ समझौता एक्सप्रेस रोखली. यावेळी ट्रेनमध्ये 27 प्रवासी होती. दरम्यान प्रवाशांना भारतात कसं पाठवायचं? यावर मात्र अद्याप निर्णय झालेला नाही. पुलवामा हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला.त्यानंतर भारतानं एअर स्ट्राईक करत पाकव्याप्त काश्मीरमधील जैश ए मोहम्मदचे तळ उद्ध्वस्त केले.


भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानी सैन्यदलांनी आक्रमक होत भारतीय लष्करी तळांना लक्ष्य करण्याचे प्रयत्न केले. पण यात पाकिस्तानला यश आलं नाही. पाकिस्तानचं एक लढाऊ विमान भारताने पाडलं. भारताच्या या कारवाईत हवाईदलाचे विंग कमांडर अभिनंदन हे चालवत असलेलं मिग विमान मात्र भरकटलं आणि अभिनंदन पाक हद्दीत पडले. त्यांना पाकिस्तानी लष्कराने ताब्यात घेतलं.

अभिनंदन यांची सुटका उद्या

भारत आणि आंतरराष्ट्रीय समुदायाकडून आलेल्या दबावानंतर पाकिस्तान अखेर विंग कमांडर अभिनंदन याची शुक्रवारी सुटका करणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संसदेत त्यांनी ही घोषणा केली. अभिनंदनच्या सुटकेच्या बदल्यात भारतावर अटी घालण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत होता. मात्र भारताने पाकिस्तानचे सर्व प्रयत्न धुडकावून लावले होते.

Loading...

जिनिव्हा करारानुसार अभिनंदनला सोडणं पाकिस्तानला भाग होतं. तर पाकिस्तानचा दबावाचा प्रयत्न होता. भारताने आक्रमक भूमिका घेतल्याने पाकिस्तानला आणखी हल्ल्याची भीती वाटत होती. पाकिस्तानचा हा डाव भारताला माहित होता. त्यामुळे अशी कुठलीही अट भारताने मान्य केली नाही आणि अखेर पाकिस्तानला भारताच्या दबावापुढे झुकावं लागलं.


VIDEO : पाकनं सीमेवरच रोखली समझौता एक्सप्रेस; प्रवाशांना भावना अनावर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 28, 2019 08:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...