NEWS18 RISING INDIA SUMMIT : 'भारत लवकरच ' स्पोर्टिंग नेशन' बनेल'

भारत आता स्पोर्टिंग नेशन बनू शकतो. न्यूज 18च्या रायझिंग इंडिया समिटच्या आधी एका पॅनलच्या चर्चेत दिग्गजांनी हे मत व्यक्त केलं.

Sonali Deshpande | Updated On: Mar 16, 2018 12:12 PM IST

NEWS18 RISING INDIA SUMMIT : 'भारत लवकरच ' स्पोर्टिंग नेशन' बनेल'

16 मार्च : मॅक्सिकोमध्ये शूटिंग वर्ल्ड कप झाला. त्यात भारत अग्रणी स्थानावर होता. दोन आठवड्यांपूर्वी महिला पहलवान नवज्योत कौरनं सीनियर कुस्ती चँपियनशिपमध्ये सुवर्ण पदक मिळवून इतिहास रचला. भारत क्रिकेटशिवाय इतर खेळांमध्येही रस घेतोय. आणि अव्वल स्थान पटकावतोय.

त्यामुळे भारत आता स्पोर्टिंग नेशन बनू शकतो. न्यूज 18च्या रायझिंग इंडिया समिटच्या आधी एका पॅनलच्या चर्चेत दिग्गजांनी हे मत व्यक्त केलं. यावेळी अयाज मेनन, सीनियर एडिटर शारदा उग्रा, माजी क्रिकेटर अतुल वासन उपस्थित होते. खेळाशी संबंधित असलेल्या या जाणकारांनी सांगितलं भारत स्पोर्टिंग देश बनण्याच्या मार्गावर आहे.

अयाज मेनन म्हणाले, ' खेलो इंडिया या प्रोजेक्टकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. मुलांना विशेष करून मुलींना मैदानात आणणं हे खरोखर एक आव्हान असेल. पण ही संकल्पना चांगली आहे.'

शारदा उग्रा म्हणाल्या मिळणारे फंडस योग्यरित्या वापरले तर भारत लवकरच स्पोर्टिंग देश बनेल.

तर अतुल वासवान म्हणाले, क्रिकेटशिवाय इतर खेळांमध्येही लोकांचा रस वाढला पाहिजे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 16, 2018 12:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close