भारत कधीही हिंदू राष्ट्र नव्हतं, नाही आणि असणारही नाही, इंशाअल्लाह- ओवेसी

भारत कधीही हिंदू राष्ट्र नव्हतं, नाही आणि असणारही नाही, इंशाअल्लाह- ओवेसी

'भारत हा विविध धर्म आणि पंथ, भाषा, संस्कृती आणि खान पान यांचा देश असून तिथे फक्त एकच धर्म लादला जावू शकत नाही.'

  • Share this:

नवी दिल्ली 13 ऑक्टोंबर : भारत हे हिंदू राष्ट्र आहे या संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत(Mohan Bhagwat)  यांच्या वक्तव्यावर ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Assadudin Owaisi) यांनी ट्विट करून उत्तर दिलंय. ओवेसी म्हणाले, भागवत हे हिंदू नाव देऊन आमचा इतिहास मिटवू शकत नाहीत. आमची संस्कृती, श्रद्धा, पंथ आणि व्यक्तिगत ओळख ही फक्त हिंदू धर्माशी संबंधीत नाही आणि असणारही नाही असंही ते म्हणाले. भारत कधीही हिंदू राष्ट्र नव्हते, नाही आणि असणारही नाही, इंशाअल्लाह असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. ओवेसींच्या या वक्तव्यावरून आता निवडणुकीच्या प्रचारात वाद होण्याची शक्यता आहे.

अमिताभ आणि ट्रम्प यांना मागे टाकून मोदी जगात 'नंबर वन', हा केला रेकॉर्ड!

हिंदू हे कुठल्याही एका पूजापद्धतीशी, पंथाशी किंवा धर्माशी संबंधीत नाही तर ती एक जीवनपद्धती आहे. भारतात जे राहतात ते सर्व हिंदू आहेत आणि त्यांचं सांस्कृतिक नातं हे हिंदू धर्माशी संबंधीत आहे असं भागवत यांनी म्हटलं होतं. नागपूर इथं झालेल्या संघाच्या विजयादशमी मेळाव्यातही त्यांनी याच मुद्यावर भर दिला होता.

शरद पवार राजकारणातले 'नटरंग', त्यामुळेच ते 'हातवारे' करताहेत -

संघ कायम हाच मुद्दा ठसविण्याचा प्रयत्न कायम करत असतो. भारत हे हिंदू राष्ट्र होतं, आहे आणि राहिल असं भागवत कायम सांगत असतात. तोच धागा पकडत त्यांनी ही भावना देशात रुजविण्याचा प्रयत्न केला आहे. ओवेसी यांनीही कायम याच मुद्यावर आक्षेप घेतला असून संघ हा एक संस्कृती आणि धर्म लादण्याचा प्रयत्न करतेय असा आरोप केलाय. भारत हा विविध धर्म आणि पंथ, भाषा, संस्कृती आणि खान पान यांचा देश असून तिथे फक्त एकच धर्म लादला जावू शकत नाही असंही ओवेसी यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 13, 2019 09:37 PM IST

ताज्या बातम्या