मसूद अझहर प्रकरण : भारतीय नेटिझन्स म्हणतायत, #BoycottChineseProducts

भारताविरुद्ध पाकिस्तानला मदत करणाऱ्या देशाला धडा शिकवण्याचा नेटिझन्सचा सूर

News18 Lokmat | Updated On: Mar 14, 2019 12:58 PM IST

मसूद अझहर प्रकरण : भारतीय नेटिझन्स म्हणतायत, #BoycottChineseProducts

नवी दिल्ली, 14 मार्च : दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करता आले नाही. चीन यावेळी पुन्हा तसेच वागणार हा अंदाज खरा ठरला. चीनने त्यांच्या नकाराधिकाराचा वापर करून मसूद अझहरला जागतिक दहशतवादी ठरवण्याच आडमुठी भूमिका घेतली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मसूद अझहरविरोधात फ्रान्स, अमेरिका आणि ब्रिटन या देशांनी प्रस्ताव दिला होता.

मसूद अझहला जागतिक दहशतवादी घोषित होण्याचा प्रस्ताव रद्द केल्यानंतरही आपली लढाई सुरू राहणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे. भारतात झालेल्या अनेक हल्ल्यात मसूद अझहरचा हात होता. त्याला दहशतवादी घोषित करण्यासाठी जे करायला लागेल ते करू असं पराराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.चीनने मसूद अझहरबाबत नकाराधिकार वापरुन खोडा घालण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2009 पासून आतापर्यंत चार वेळा असा प्रकार चीनने केला आहे. याचा भारतीयांच्या राग भारतीय नागरिकांच्या मनात आहे. आता चीनला धडा शिकवण्यासाठी चिनी मालावर बहिष्कार घालण्यासाठी ट्विटरवर मोहिम सुरू करण्यात आली आहे. #BoycottChineseProducts ट्विटरवर टॉप ट्रेंडमध्ये आहे.

Loading...चिनी मालावर बहिष्कार घातल्यास भारताचा पैसा पाकिस्तानला मदत करणाऱ्या देशाकडे म्हणजेच चीनकडे जाणार नाही. दहशतवादाचे समर्थन करणाऱ्या देशाशी कोणत्याही प्रकारचे व्यवहार करु नयेत असा नेटिझन्सचा सूर आहे. होळीला चिनी वस्तूंचे दहन करावे तर त्याऐवजी स्वदेशी वस्तू वापराव्यात अशा प्रतिक्रिया ट्विटरवर देण्यात आल्या आहेत.मसूदविरोधातील पुरावे पाकिस्तानकडे सुपूर्द

भारत सरकारने पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा आरोपी आणि जैश-ए-मोहम्मद म्होरक्या मसूद अझहरविरोधातील सर्व पुराव्यासंहीत पाकिस्तानला डॉजियर सोपवलं आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झालेत. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या(सीआरपीएफ)ताफ्यावर हा भ्याड हल्ला केला. हल्ला झाला त्यावेळेस सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.


VIDEO: असं काय म्हणाले शरद पवार? ज्यामुळे पार्थनं घेतला काढता पायबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 14, 2019 12:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...