पाकिस्तानच्या सीमेवरून पंजाबमध्ये घुसला ड्रोन, सीमेवर हाय अलर्ट

पाकिस्तानच्या सीमेवरून पंजाबमध्ये घुसला ड्रोन, सीमेवर हाय अलर्ट

पंजाबमध्ये शस्त्रं टाकण्यात आल्यानंतर आता एक ड्रोनही पाठवल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर पंजाब पोलिसांनी एक शोधमोहीम हाती घेतली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर : पंजाबमध्ये शस्त्रं टाकण्यात आल्यानंतर आता एक ड्रोनही पाठवल्याची घटना समोर आली आहे. पाकिस्तानमधून आलेला एक ड्रोन पंजाबमधल्या हुसैनीवाला सेक्टरमध्ये दिसला. त्यानंतर पंजाब पोलिसांनी एक शोधमोहीम हाती घेतली आहे. सुरक्षादलंही हाय अलर्टवर आहेत.

सोमवारी रात्री पंजाबच्या हुसैनीवाला सेक्टरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी रात्री 10 ते 10: 40 च्या सुमाराला पाकिस्तानच्या सीमेकडून एक ड्रोन येताना पाहिला. सूत्रांच्या माहितीनुसार, भारताच्या सीमेवर हा ड्रोन 4 वेळा दिसला तर भारताच्या बाजूला 1 वेळा दिसला.

हा ड्रोन पाहिल्यानंतर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही माहिती दिली. त्याचवेळी ड्रोनचा शोध घेण्यासाठी शोधमोहीमही हाती घेण्यात आली.

मागच्या महिन्यांतही तरनतारनमध्ये ड्रोनमधून एके - 47, बंदुकीच्या गोळ्या, सॅटेलाइट फोन, ग्रेनेड आणि नकली नोटा टाकण्यात आल्या होत्या.

(हेही वाचा : मंदीचा सगळ्यात जास्त फटका या कार कंपनीला,गेल्या 9 महिन्यांत विकली गेली एकच कार)

याआधी सप्टेंबर महिन्यात पंजाब सरकारने 2 पाकिस्तानी ड्रोन जप्त केले होते. या ड्रोनची निर्मिती चिनी कंपनी टी मोटर्सने केली होती हेही समोर आलं आहे.

पंजाबमधल्या महावा गावातही एक ड्रोन सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी 4 जणांना अटक केली होती. खलिस्तान जिंदाबाद फोर्स या दहशतवादी गटाच्या या कारवाया होत्या, असं तपासात आढळून आलं.

या दहशतवाद्यांसोबत जैश ए मोहम्मद ही दहशतवादी संघटना या हल्ल्याचा कट रचत होती.

===============================================================================================

EXCLUSIVE : जे चाललं ते योग्य नाही, शरद पवारांची UNCUT मुलाखत

Published by: Arti Kulkarni
First published: October 8, 2019, 4:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading