AirStrikes करण्याआधी भारताने वापरले हे ड्रोन, पाकचे रडार झाले ठप्प

या कारवाईमध्ये 200 ते 300 अतिरेकी ठार झाले. ही कारवाई करत असताना भारताने इस्त्रायल अवॉक्स (नेत्र) चा वापर केला

News18 Lokmat | Updated On: Feb 26, 2019 05:01 PM IST

AirStrikes करण्याआधी भारताने वापरले हे ड्रोन, पाकचे रडार झाले ठप्प

26 फेब्रुवारी : भारतीय वायूसेनेनं पाकिस्तान व्याप्त भागात हवाई हल्ला करून पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला. आज पहाटे साडेतीनच्या सुमारास भारतीय वायूदलाच्या मिराज-2000 या विमानांच्या ताफ्याने बालाकोट परिसरातील जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर तुफान बॉम्बफेक केली होती. या कारवाईमध्ये 200 ते 300 अतिरेकी ठार झाले. ही कारवाई करत असताना भारताने इस्त्रायल अवॉक्स (नेत्र) चा वापर केला.

असं सांगितलं जातं की, इस्त्रायल अवॉक्स (नेत्र) ने पाकिस्तानची रडार यंत्रणा ठप्प केली होती. त्यानंतर हारोन ड्रोनने पाकमधील दहशतवाद्यांच्या अड्डयांचा माग काढला. जशी ड्रोनकडून माहिती मिळाली तेव्हा मिराज-२०० या लढाऊ विमानांनी दहशतवाद्यांच्या तळावर एकच हल्ला केला.

जम्मू-काश्मिरमध्ये पुलवामा इथं सीआरपीएफच्या ताफ्यावर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. याचा बदला घेण्यासाठी भारतीय वायूदलाने पाकव्याप्त भागात घुसून हल्ला केला. भारतीय वायूदलाच्या हल्ल्यात हा शस्त्रांचा साठा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे समजते. यामध्ये २०० एके सीरीजच्या रायफल्स, अगणित काडतुसे, ग्रेनेड, स्फोटके आणि डिटोनेटर अशा साधनांचा समावेश होता. या हल्ल्यात मसूद अजहरचा मेव्हणा आणि जैश ए मोहम्मदचा प्रमुख नेता मौलाना युसूफ अजहर याच्यासह 200 हून अधिक दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे जैश-ए-मोहम्मदला मोठा झटका बसल्याचं मानलं जात आहे. या हल्ल्यामुळे भारताने पुन्हा एकदा जगाला आपले लष्करी सामर्थ्य दाखवून दिले आहे.

असंही सांगितलं जात आहे की, पाकिस्तानमध्ये भारताने केलेली कारवाईही सर्वात मोठी मानली जात आहे. वायूसेनेचे पाच ते सहा लाँचिंग पॅड उद्धवस्त केले आहे.


Loading...

====================


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 26, 2019 05:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...