'आमचं प्राधान्य देशाच्या हिताला', रशियाशी केलेल्या करारावरून जयशंकर यांचं अमेरिकेला उत्तर

'आमचं प्राधान्य देशाच्या हिताला', रशियाशी केलेल्या करारावरून जयशंकर यांचं अमेरिकेला उत्तर

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॅम्पिओ सध्या भारत दौऱ्यावर आहेत. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी त्यांच्याशी भारत आणि अमेरिका संबंधांबद्दल सविस्तर चर्चा केली. यामध्ये भारताने रशियाशी केलेल्या क्षेपणास्त्र कराराचाही मुद्दा होता. त्यावर जयशंकर यांनी स्पष्टपणे भारताची भूमिका मांडली.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 जून : अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॅम्पिओ सध्या भारत दौऱ्यावर आहेत. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी त्यांच्याशी भारत आणि अमेरिका संबंधांबद्दल सविस्तर चर्चा केली. यामध्ये भारताने रशियाशी केलेल्या क्षेपणास्त्र कराराचाही मुद्दा होता. त्यावर जयशंकर यांनी स्पष्टपणे भारताची भूमिका मांडली.

दुसऱ्या देशांशी संबंध ठेवताना भारत नेहमीच आपल्या हिताचा विचार करेल, असं जयशंकर यांनी पॅम्पिओ यांना सांगितलं. अमेरिका हा भारताचा महत्त्वाचा सहकारी देश आहे आणि दोन्ही देशांमधले संबंध नव्या उंचीवर पोहोचले आहे, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.

क्षेपणास्त्र कराराचा मुद्दा

अमेरिकेने रशियावर काही निर्बंध घातले आहेत. त्याचवेळी भारताने रशियाकडून एस 400 ही क्षेपणास्त्रं खरेदी केली आहेत. यावरही भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चा झाली. त्यावर जयशंकर म्हणाले, रशिया आणि भारताचे जुने संबंध आहेत. या मैत्रीला एक इतिहास आहे आणि आम्ही जे करू ते राष्ट्रहितासाठीच असेल. त्याचवेळी दुसऱ्या देशाच्या हिताचा सन्मान करणं हेही आमचं कर्तव्य आहे.

भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये व्यापारविषयक संबंधही दृढ आहेत, असं एस. जयशंकर म्हणाले. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांशी आर्थिक वृद्धी, इराण, अफगाणिस्तान, दहशतवाद या मुद्द्यांवर चर्चा झाली, असंही त्यांनी सांगितलं.

दहशतवादाविरुद्घच्या मोहिमेत अमेरिकेने भारताला दिलेल्या सहकार्याबद्दल जयशंकर यांनी ट्रम्प प्रशासनाचे आभार मानले.

पंतप्रधान मोदींची घेतली भेट

माइक पॅम्पिओ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही भेट घेतली. भारत -अमेरिका संबंधांवर या भेटीत विस्तृत चर्चा झाली. भारतात नवं सरकार आल्यानंतर भारत आणि अमेरिकेमधली ही पहिलीच उच्चस्तरीय चर्चा आहे.

==============================================================================================

मराठा विद्यार्थ्यांना दिलासा, जात प्रमाणपत्रासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

First published: June 26, 2019, 8:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading