मराठी बातम्या /बातम्या /देश /मोठी बातमी! भारत- अमेरिकेची 26 तारखेला दिल्लीत मोठी बैठक; चीनला लगाम घालण्यासाठी होऊ शकतो निर्णायक करार

मोठी बातमी! भारत- अमेरिकेची 26 तारखेला दिल्लीत मोठी बैठक; चीनला लगाम घालण्यासाठी होऊ शकतो निर्णायक करार

India USA relations : 2+2 (2 plus 2 meeting) मंंत्रिस्तरावरच्या या बैठकीत संरक्षण विषयक करारांवर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे.

India USA relations : 2+2 (2 plus 2 meeting) मंंत्रिस्तरावरच्या या बैठकीत संरक्षण विषयक करारांवर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे.

India USA relations : 2+2 (2 plus 2 meeting) मंंत्रिस्तरावरच्या या बैठकीत संरक्षण विषयक करारांवर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर : आंतरराष्ट्रीय राजकारणावर दूरगामी परिणाम करणारी एक मोठी बातमी आली आहे. भारत-अमेरिका संबंधांना एक नवा परिमाण देण्यासाठी मंत्रिस्तरावरची आतापर्यंतची तिसरी बैठक पुढच्या आठवड्यात दिल्लीत होत आहे. 2+2 (2 plus 2 meeting) मंंत्रिस्तरावरच्या या बैठकीत संरक्षण विषयक करारांवर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. चीनच्या वाढत्या महत्त्वाकांक्षांना लगाम लावण्यासाठी महत्त्वाचे निर्णय या दोन देशांमध्ये होण्याची शक्यता आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defence Minister Rajnath Singh)आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (MEA S Jaishankar) यांच्याबरोबर अमेरिकेचे त्यांच्या समपदावरील मंत्री (Mike Pompeo) आणि (Mark Esper) या बैठकीत सहभागी होणार आहेत.

भारत आणि अमेरिका या दोन देशांमध्ये गुप्तवार्तांचं आदानप्रदान (Intelligence Sharing Agreement) होऊ शकतं. येत्या 26 आणि 27 ऑक्टोबरला राजनाथ सिंह, जयशंकर आणि अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट माइक पाम्पिओ आणि संरक्षण सचिव मार्क एस्पर यांच्यात बैठक होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकी अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांच्यात 2017 मध्ये झालेल्या राजनैतिक संवादानंतर होणारी ही तिसरी बैठक आहे. दोन देशांमध्ये विविध मुद्द्यांवर समन्वय करार करण्याचा विचार त्याच वर्षी झाला होता. त्यानुसार आता ही बैठक होत आहे.

भारत चीन सीमेवरच्या तणावामुळे आता परिस्थिती थोडी बदलली आहे. चीनने दक्षिण चायना समुद्रात आगळीक केल्याने त्यांच्या वाढत्या महत्त्वाकांक्षेला वेसण घालण्याची गरज अमेरिकेलाही वाटत आहे. त्या दृष्टीने संरक्षण विषयक महत्त्वाचे करार या बैठकीत भारताबरोबर होऊ शकतात.

हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार दोन देशांमध्ये BECA (बेसिक एक्सचेंज अँँड कोऑपरेशन अॅग्रीमेंट) नावाचा करार होणार आहे. भारताला पिन पॉइंटेड हल्ल्यांसाठी आवश्यक स्थानिक डेटा पुरवणारा MQ-9B ड्रोनसारखी संरक्षणविषयक मदत यातून मिळणार आहे.  3 नोव्हेंबरला अमेरिकेत अध्यक्षीय निवडणूक होत आहे. त्याआधी भारताबरोबरचा हा संवाद महत्त्वाच ठरू शकतो.

First published:
top videos

    Tags: India america, United States of America