बेरोजगारीचा दर वाढला! गेल्या 45 वर्षांतला सर्वाधिक दर

मोदी सरकारचा शपथविधी झाल्याझाल्या लगेचच भारतातल्या बेरोजगारीची आकडेवारी उघड झाली आहे. बेरोजगारीचा दर 6.1 टक्क्यांवर गेला असून तो गेल्या 45 वर्षांतला हा नीचांक आहे.

News18 Lokmat | Updated On: May 31, 2019 11:32 PM IST

बेरोजगारीचा दर वाढला! गेल्या 45 वर्षांतला सर्वाधिक दर

नवी दिल्ली, 31 मे : लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी बेरोजगारीचा मुद्दा लावून धरला होता. या आकडेवारीवर बरेच वादविवादही झाले. पण मोदी सरकारला मतदारांनी भरघोस मतांनी निवडून दिल्यामुळे हा मुद्दा मागे पडला होता.

आता मोदी सरकारचा शपथविधी झाल्याझाल्या लगेचच भारतातल्या बेरोजगारीची आकडेवारी उघड झाली आहे. बेरोजगारीचा दर 6.1 टक्क्यांवर गेला असून तो गेल्या 45 वर्षांतला हा नीचांक आहे.

नव्या सरकारसमोर आव्हान

देशातली बेरोजगारी हे नव्या सरकारसमोर मोठं आव्हान आहे. त्याचबरोबर देशाचा GDP म्हणजेच सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा दरही खालावला आहे. गेल्या काही तिमाहीतला हा सगळ्यात कमी दर आहे. यामुळे भारत चीनच्याही मागे पडला आहे.

नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिसने घेतलेल्या सर्व्हेनुसार जुलै 2017 ते जून 2018 या काळातली बेरोजगारीची आकडेवारी बाहेर आली होती. 1972-73 या वर्षात हा बेरोजगारीचा दर सगळ्यात जास्त होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा बेरोजगारीच्या दरात गंभीर वाढ झाली आहे.

Loading...

GDP मध्ये घट

शेतीक्षेत्र आणि उत्पादन क्षेत्रातली कामगिरी खालावल्यामुळे GDP म्हणजेच सकल राष्ट्रीय उत्पन्न दरात घट झाली आहे, असं सेंट्रल स्टॅटिस्टिक्स ऑफिसचं म्हणणं आहे.

मागच्या आर्थिक वर्षात जीडीपीचा दर 7.2 टक्के होता. हा दर खालावून 2018-19 मध्ये 6.8 वर आला आहे.

औद्योगिक उत्पादनात घट

2014-2015 या आर्थिक वर्षानंतर GDP म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा दर इतका खाली आहे. 2013-14 या वर्षांत एकदा हा दर 6.4 इतका होता.

मोदी सरकारसमोर हा GDP वाढवण्याचं आव्हान आहे. त्याचबरोबर बेरोजगारी घटवणं आणि औद्योगिक उत्पादन वाढवण्यासाठीही या सरकारला प्रयत्न करावे लागणार आहेत.

======================================================================

VIDEO : मोबाईलवर गेम खेळणे पडले महागात, दहावीच्या विद्यार्थ्याचा डोळा निकामी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 31, 2019 08:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...