S M L

दिवसभरातील 5 महत्त्वाच्या बातम्या

Updated On: Mar 16, 2019 06:42 AM IST

दिवसभरातील 5 महत्त्वाच्या बातम्या

भाजपची पहिली यादी


लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून आज पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. या यादीमध्ये १८ उमेदवारांचा समावेश असणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.



अर्जुन खोतकरांचा निर्णय?


Loading...

जालना मतदारसंघामुळे भाजप आणि शिवसेनेत धुसफूस सुरू आहे. सेनेचे नेते अर्जुन खोतकर उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज आहे. दोन दिवसांपूर्वी खोतकरांनी काँग्रेसचे नेते अब्दुल सत्तार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर दोन दिवसांत निकाल लागेल असं सूचक वक्तव्य खोतकरांनी केलं होतं. त्यामुळे खोतकर काय घोषणा करता हे पाहण्याचं ठरणार आहे.


काँग्रेसची बैठक


लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोर बैठका सुरू आहे. नवी दिल्लीत काँग्रेसच्या निवड समितीची बैठक होणार आहे. दरम्यान, काँग्रेसकडून शुक्रवारी रात्री तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.


भाजपची बैठक


भाजप केंद्रीय निवडणूक समितीची नवी दिल्लीत बैठक पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार असल्याचं कळतंय. या बैठकीत निवडणुकीची रणनीतीवर चर्चा होणार असल्याचं कळतंय.


राहुल गांधी शहिदांच्या कुटुंबीयांच्या भेटीला


काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी देहरादूनच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान ते पुलवामा हल्ल्यात शहिदांच्या कुटुंबीयांची सांत्वन भेट घेणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 16, 2019 06:42 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close