पुण्यात पाणी कपातीचं संकट, आज होणार निर्णय : या आहेत महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात पाणी कपातीचं संकट, आज होणार निर्णय : या आहेत महत्त्वाच्या बातम्या

ण्याला पाणीपुरवढा करणाऱ्या सर्व धरणांमध्ये पाण्याचा साठा कमी झाला आहे. त्यामुळे जून महिन्यापर्यंत पाणी टिकवण्यासाठी नियोजन आवश्यक असून त्याची बैठक आज होणार आहे.

  • Share this:

  • पुण्याला पाणीपुरवढा करणाऱ्या सर्व धरणांमध्ये पाण्याचा साठा कमी झाला आहे. त्यामुळे जून महिन्यापर्यंत पाणी टिकवण्यासाठी नियोजन आवश्यक असून त्याची बैठक आज होणार आहे. पालकमंत्री गिरीष बापट यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून त्यात पाणीकपातीचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
  • यंदाचा महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख मुंबईत कृष्ण कुंजवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहे. पुण्याच्या अभिजितचा पराभव करत बालाने जालण्यात झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला होता.
  • मेघालयातल्या कोळसा खाणीत 15 मजूर गेल्या काही दिवसांपासून अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र खाणींमध्ये पाणी शिरल्याने मजुरांना बाहेर काढण्यास अडचणी येत आहेत. बचाव कार्यात लष्कराचीही मदत घेतली जात आहे.
  • निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्य प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू, पुद्दुचेरी इथल्या खासदारांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या ऐकून घेणार आहेत.
  • भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या कसोटी सामन्याचा आजचा तिसरा दिवस आहे.

First published: December 28, 2018, 6:56 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading