S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

भाजपचा जाहीरनामा आज होणार प्रसिद्ध, या आहेत महत्त्वाच्या बातम्या

Updated On: Apr 8, 2019 06:57 AM IST

भाजपचा जाहीरनामा आज होणार प्रसिद्ध, या आहेत महत्त्वाच्या बातम्या

भारतीय जनता पार्टी आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. काँग्रेसच्या न्याय योजनेला तोंड देण्यासाठी भाजप काय घोषणा करते याकडे सगळ्यांचं लक्ष लगालं आहे.

तिसऱ्या टप्प्यासाठी उमेदवरी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. औरंगाबादमधून काँग्रेसचे बंडखोर उमेदवार अब्दुल सत्तार उमेदवारी अर्जम मागे घेतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

आज अनेक दिग्गज उमेदवार अर्ज भरणार आहेत.  उर्मिला मांतोडकर प्रिया दत्त आणि संजय निरूपम उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकसभा निवडणूक अर्ज दाखल करणार


याशिवाय मिलिंद , देवरा , राहुल शेवाळे , अरविंद सावंत हेही अर्ज दाखल करणार आहेत.

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या मदतनीसांवर इन्कमटॅक्स विभागाने घातलेल्या छाप्यांमध्ये मोठी रक्कम मिळाली आहे. त्यासंबंधी कारवाई आजही सुरू राहणार असून नवे खुलासे होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रसह देशात प्रचार सभा होणार आहेत. आजही आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता आहे.


VIDEO : गोपनाथ मुंडेंचा राजकीय वारसा, धनंजय आणि पंकजा आमने-सामने

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 8, 2019 06:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close