आजपासून अण्णांचं पुन्हा उपोषण, या आहेत आजच्या महत्त्वाच्या बातम्या

आजपासून अण्णांचं पुन्हा उपोषण, या आहेत आजच्या महत्त्वाच्या बातम्या

  • Share this:

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आजपासून उपोषणाला बसत आहेत. अण्णांच्या काही महत्त्वाच्या मागण्या सरकारने मंगळवारी मान्य केल्या. मात्र अण्णा आपल्या भूमिकेवर कायम आहेत. राळेगण इथं ते उपोषणाला सुरुवात करणार आहेत.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आज अर्थसंकल्प मांडण्याची शक्यता आहे. पर्रिकर यांची प्रकृती सध्या चांगली नाही. मात्र अशा परिस्थितीतही ते कामकाज करत आहेत. त्यामुळे आज नेमकं ते काय करतात याकडे लक्ष लागलंय.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या अध्यक्षा सुमीत्रा महाजन यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. संसदेचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी ही बैठक आहे.

भाजपचे अध्यक्ष अमित शहा लखनऊ दौऱ्यावर आहेत. ते बुथ प्रमुखांच्या बैठकीला मार्गर्शन करणार आहेत. प्रियांका गांधी यांच्या राजकारणातल्या सक्रिय प्रवेशानंतरचा त्यांचा हा लखनऊचा पहिलाच दौरा आहे त्यामुळे ते काय बोलतात याकडे सगळ्यांच लक्ष लागलंय.

First published: January 30, 2019, 7:24 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading