बाळासाहेब ठाकरे यांच्या चित्रपटाचं ट्रेलर लॉन्च होणार; या आहेत आजच्या महत्त्वाच्या बातम्या

बाळासाहेब ठाकरे यांच्या चित्रपटाचं ट्रेलर लॉन्च होणार; या आहेत आजच्या महत्त्वाच्या बातम्या

  • Share this:

शरद पवार यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधींची स्तुती केल्याने राजकीय पक्षांच्या भुवया उंचावल्या असून आज त्यावर देशभरातून प्रतिक्रीया येण्याची शक्यता आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चित्रपटाचे ट्रेलर लॉन्च होणार असून सगळ्यांना त्या ट्रेलरची प्रतिक्षा आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार कंबर कसली आहे. ते बुधवारी उत्तर प्रदेशातल्या खासदारांच्या भेटी घेणार आहेत. दोन टप्प्यात या भेटी होणार असून पश्चिम आणि मध्य उत्तर प्रदेशातल्या खासदारांना ते भेटणार आहेत.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के.सी. चंद्रशेखर राव बुधवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. राव हे विविध प्रादेशिक नेत्यांच्या भेट घेत तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहेत. या आधी त्यांनी नवीन पटनायक, ममता बॅनर्जी इत्यादी नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. काँग्रेसच्या महाआघाडीला त्यांचा पाठिंबा नाही.

भारत आणि ऑस्ट्रेलियाची तीसरी क्रिकेट कसोटी मेलबोर्नला सुरू होतेय. भारत या कसोटीत दमदार कामगिरी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

First published: December 26, 2018, 6:41 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading