मराठवाड्याच्या दुष्काळाची होणार पाहणी : या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या

मराठवाड्याच्या दुष्काळाची  होणार पाहणी : या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या

  • Share this:

दुष्काळाची पाहणी

मराठवाड्यातल्या दुष्काळाच्या पाहणीसाठी केंद्राच्या तीन सदस्यांचं पथक आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर येणार आहे. हे पथक शेतकऱ्यांची भेट घेऊन, प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करणार आहे आणि त्याचा अहवाल केंद्र सरकारला देणार आहे. त्यानंतर केद्र सरकार दुष्काळासाठी महाराष्ट्राला किती मदत द्यायची याचा निर्णय घेणार आहे.

चैत्यभूमी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त लाखो अनुयायी चैत्यभूमीवर आले आहेत. आजपासूनच चैत्यभूमीवर पुस्तकांचे स्टॉल्स लागले असून देशभरातून आंबेडकरी अनुयायांचं आगमन सुरूच आहे. 6 डिसेंबरला सकाळपासूनच विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय.

मंत्रिमंडळ बैठक

राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक आज होणार आहे. मराठा आरक्षणाला मान्यता दिल्यानंतर या बैठकीत आणखी कुठला महत्त्वाचा निर्णय होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. दुष्काळ आणि 72 हजार पदांची मेगाभरती यावरही मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार होण्याची शक्यता आहे.

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड भ्रष्टाचार प्रकरणातला मुख्य मध्यस्ती ख्रिस्टीन मिशेल याला दुबईत सीबीआयने ताब्यात घेतलंय. एक विशेष ऑपरेशन करून सीबीयानं त्याला जेरबंद केलं. आज त्याला विशेष  विमानाने दिल्लीत आणलं जाणार आहे. नंतर त्याला सीबीआय अटक करणार आहे.

आज संपणार प्रचार

राजस्थान आणि तेलंगणातल्या विधानसभा निवडणुकीचा आजचा शेवटचा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी, अमित शहा अशी दिग्गज मंडळी शेवटच्या दिवशी तुफान प्रचार करणार आहेत. सात तारखेला मतदान असून 11 डिसेंबरला सर्वच राज्यांची मतमोजणी आहे.

First published: December 4, 2018, 11:44 PM IST

ताज्या बातम्या