ऑगस्टा वेस्टलँड
ऑगस्टा वेस्टलँड भ्रष्टाचार प्रकरणातला मुख्य दलाल ख्रिश्चियन मिशेल याला पाच दिवसांची सीबीआय कोठडी मिळाली असून सीबीआय त्याची कसून चौकशी सुरू करणार आहे.
दुष्काळी पाहणी
केंद्राचं पथक आजही राज्यातल्या विविधा दुष्काळी भागांची पाहणी करणार आहे. बुधवारीही या पथकानं मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन माहिती घेतली होती.
महापरिनिर्वाण दिन
समता आणि बंधुतेची शिकवण देणारे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा गुरुवारी 62 वा महापरिनिर्वाण दिन. बाबासाहेबांनी देशातल्या कोट्यवधी लोकांना आत्मभान दिलं. जगण्याची प्रेरणा दिली. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र दिला. बाबासहेबांना अभिवादन करण्यासाठी लाखो लोक आद दादरमधल्या चैत्यभूमीवर आले आहेत. दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे.
बुलंदशहर
बुदंलशहरमध्ये ज्या पोलीस अधिकाऱ्याचा गोळी लागून मृत्यू झाला होता त्या अधिकाऱ्याच्या घरी जाऊन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहे.
क्रिकेट
ऑस्ट्रेलियात आजपासून भारत आणि ऑस्ट्रेलियात चार मालिकांची सुरूवात होणार असून विराट कोहोलीची कसोटी लागणार आहे.