जागावाटपासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीत पुन्हा चर्चा, या आहेत आजच्या महत्त्वाच्या बातम्या!

जागावाटपासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीत पुन्हा चर्चा, या आहेत आजच्या महत्त्वाच्या बातम्या!

भाजप आणि शिवसेनेचा युतीबाबतचा घोळ वाढण्याची शक्यता आहे.

  • Share this:

  • काँग्रेस आणि राष्ट्रावादी काँग्रेसमध्ये जागावाटपा संदर्भात चर्चा करण्यासाठी मुंबईत बैठक होत आहे. या बैठकीत अहमदनगरच्या जागेबाबत जो तिढा निर्माण झाला त्यावर चर्चा होणार आहे.
  • मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे मुलगा अमित ठाकरे याच्या लग्नाची पत्रिका आज दगडूशेठ हलवाई गणपतीला देणार आहेत. ते लवकरच दिल्लीतही जाणार असून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना टाळून राहुल गांधी भेट घेण्याची शक्यता आहे.
  • भाजप आणि शिवसेनेचा युतीबाबतचा घोळ वाढण्याची शक्यता आहे. शिवसेना पंतप्रधान मोदींना थेट आव्हान देण्याच्या तयारीत असल्याने भाजपकडून आज तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओरिसाच्या दौऱ्यावर आहेत. ते बारीपाडा इथे एलपीजीचा नवा गॅस पाईप लाईन प्रकल्प देशाला समर्पित करणार आहेत. मोदी हे पुरी या मतदार संघातून लोकसभेच्या निवडणुकीला उभे राहण्याची शक्यताअसल्याची चर्चा आहे. त्यामुळे या दौऱ्यात ते काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

First published: January 5, 2019, 7:20 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading