जैश ए मोहंमदचा म्होऱ्हक्या मसूद अझहरच्या मृत्यूबाबत सस्पेंस कायम आहे. मसूदचा कर्करोगामुळे मृत्यू झालाय अशी माहिती सूत्रांनी दिलीय तर पाकिस्तानकडून मात्र त्याचं खंडण करण्यात आलं आहे.
आज महाशिवरात्र आहे. देशभर शंकराच्या मंदिरांमध्ये विशेष पूजेचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे सद्गुगुरू जग्गी वासुदेव यांच्या तामिळनाडू इथल्या आश्रमात होणाऱ्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. ते विविध विकासकामांचा शुभारंभ करणार असून काही जाहीर सभांनाही संबोधित करणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज कुर्ल्यात जाहीर सभा होणार आहे. निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाली नसली तरी सर्व पक्षांनी प्रचाराला सुरूवात केली आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या कुंभमेळ्याचा आज शेवटचा दिवस आहे. आत्तापर्यंत झालेल्या तीन शाही स्नान पार पडली. या काळात कोट्यवधी लोकांनी पवित्र संगमात स्नान केलं.