भाजपचे दोन नेते राष्ट्रवादीत करणार प्रवेश : या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या

News18 Lokmat | Updated On: Dec 6, 2018 11:43 PM IST

भाजपचे दोन नेते राष्ट्रवादीत करणार प्रवेश : या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रवादीत प्रवेश

माजी मंत्री प्रकाश हिरे आणि त्यांचे पुत्र अपूर्व हिरे आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. शरद पवार यांच्या उपस्थितीत ते भाजपला सोडचिढ्ढी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश करतील. त्यानंतर शरद पवार पत्रकार परिषदही घेणार आहेत.


मतदान

राजस्थान आणि तेलंगणात आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. हे शेवटच्या टप्प्यातलं मतदान असून 11 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री वसुंधराराजे यांचं भवितव्य पणाला लागलंय.

Loading...


न्यू इंडिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतल्या एका कार्यक्रमात न्यू इंडिया या आपल्या संकल्पनेविषयी आपले विचार मांडणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते काय बोलतीय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.


दुष्काळी दौरा

दुष्काळी दौऱ्यावर असलेल केंद्राचं पथक आजही राज्यातल्या काही भागांचा दौरा करणार आहे. त्यानंतर हे पथक आपला अहवाल केंद्राला सादर करेल. त्यानंतर केंद्राकडून राज्याला मदतीचा मार्ग मोकळा होईल.


मुख्यमंत्री नगरमध्ये

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रचारसभा घेणार आहेत. गुरुवारी त्यांनी धुळ्याला प्रचारसभा घेऊन राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 6, 2018 11:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...