कोलकत्यात हायहोल्टेज ड्रामा ते अण्णा हजारेंपर्यंत या आहेत आजच्या महत्त्वाच्या घडामोडी

केंद्र सरकारवर दडपशाहीचा आरोप करत ममता बॅनर्जी रात्रभर धरणं आंदोलन केलं. या घटनेनंतर देशभरातल्या विरोधीपक्षांच्या नेत्यांनी ममता बॅनर्जींना पाठिंबा व्यक्त केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 4, 2019 06:51 AM IST

कोलकत्यात हायहोल्टेज ड्रामा ते अण्णा हजारेंपर्यंत या आहेत आजच्या महत्त्वाच्या घडामोडी

केंद्र  सरकारवर दडपशाहीचा आरोप करत ममता बॅनर्जी रात्रभर धरणं आंदोलन केलं. या घटनेनंतर देशभरातल्या विरोधीपक्षांच्या नेत्यांनी ममता बॅनर्जींना पाठिंबा व्यक्त केला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादीचे नते शरद पवार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल,आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू, मायावती, अखिलेश यादव यांनी ममता बॅनर्जींना पाठिंबा व्यक्त केला आहे. तर अनेक नेते सोमवारी कोलकत्यात येण्याची शक्यता आहे.

सीबीआय सुप्रीम कोर्टात जाणार

कोलकता पोलिसांच्या भूमिकेविरुद्ध सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची माहिती सीबीआयचे हंगामी प्रमुख नागेश्वर राव यांनी दिली आहे. ते म्हणाले आम्ही आमच्या कायदेतज्ज्ञांशी चर्चा केली आहे. सोमवारी आम्ही सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल करू. कोलकत्याचे पोलीस आयुक्त  राजीव कुमार यांच्य विरुद्ध भक्कम पुरावे असून ते पुरावे नष्ट करत होते असा आरोपही त्यांनी केला.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पाठिंबा

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ममता बॅनर्जी यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय.  मी ममता बॅनर्जींशी चर्चा केली आहे, या प्रकरणी आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहोत असं राहुल गांधींनी ट्विट करून स्पष्ट केलंय.

Loading...

अण्णा हजारे

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. मुख्यमंत्र्यांचं पत्र घेऊन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन अण्णांना भेटणार आहेत. तर अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण अण्णांची भेट घेणार आहेत.

कुपोषणावर पुस्तक

राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी कुपोषणावर लिहिलेल्या पुस्तकाचे आज यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सभागृहात प्रकाशन होणार आहे.  या प्रकाशन सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन्ही नेते उपस्थित राहणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 4, 2019 06:49 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...