नवी दिल्ली, 19 : लोकसभा निवडणूक 2019 मधील सातही टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर एक्झिट पोलचे अंदाजदेखील समोर आले आहेत. 'India Today'च्या एक्झिट पोलनुसार NDA 350-365 जागा, UPA 77-108 जागा आणि अन्य 69-95 जागा असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे याही एक्झिट पोलमध्ये लोकसभा निवडणूक 2019मध्ये NDA सरकार स्थापन करणार असल्याचं चित्र दिसत आहे. पण 2019 मध्ये कोणता पक्ष सत्तेच्या खुर्चीत विराजमान होणार, याचे निकाल 23 मे रोजी स्पष्ट होतील. 'नेटवर्क 18'च्या एक्झिट पोलनुसार 2019 लोकसभा निवडणुकीतही 'अब की बार मोदी सरकार'च येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एनडीएला 336 जागा, यूपीएला 82 जागा तर अन्य पक्षांना 124 जागा मिळणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.
पाहा :EXIT POLL VIDEO : शरद पवारांची चिंता खरी ठरणार, अजितदादांना बसू शकतो धक्का
'नेटवर्क 18'च्या एक्झिट पोलनुसार आलेले अंदाज
पक्ष जागा (542) टक्केवारी
NDA 336 48.5 टक्के
भाजप 276 39.6 टक्के
घटकपक्ष 60 8.9 टक्के
UPA 82 25.0 टक्के
काँग्रेस 46 18.8 टक्के
आघाडी 36 6.2 टक्के
अन्य 124 26.5 टक्के
टीएमसी 38 4.5 टक्के
सपा 10 2.1 टक्के
बसपा 7 2.5 टक्के
टीआरएस 12 1.6 टक्के
बीजेडी 13 2.0 टक्के
YSRCP 13 1.9 टक्के
डावे 12 2.6 टक्के
आप 1 0.2 टक्के
टीडीपी 11 1.9 टक्के
अन्य 7 7.2 टक्के
वाचा :EXIT POLL 2019 : छत्तीसगडमध्ये काँग्रेसला धक्का, राज्यात पुन्हा कमळच फुलणार
'नेटवर्क 18'च्या एक्झिट पोलनुसार, देशात 'फिर एक बार मोदी सरकार' येणार असल्याचं चित्र दिसत आहे. यंदाही मोदी लाट कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
वाचा : निकालाआधीचा एक्झिट पोल म्हणजे काय, कशी जाहीर होते आकडेवारी? जाणून घ्या
7 टप्प्यात पार पडलं मतदान
पहिला टप्पा : 20 राज्यांतील 91 मतदारसंघ
दुसरा टप्पा : 14 राज्यांतील 97 मतदारसंघ
तिसरा टप्पा : 14 राज्यातील 115 मतदारसंघ
चौथा टप्पा : 9 राज्यातील 71 मतदारसंघ
पाचवा टप्पा : 7 राज्यांत 51 मतदारसंघ
सहावा टप्पा : 7 राज्यातील 59 मतदारसंघ
सातवा टप्प : 8 राज्यातील 59 मतदासंघ
वाचा : EXIT POLL VIDEO : प्रीतम मुंडे दिल्ली गाठणार, शिंदेंना भारी पडणार 'वंचित फॅक्टर'?
तर दुसरीकडे आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, केरळ, मेघालय, मिझोराम, नागालँड, पंजाब, सिक्कीम, तेलंगणा, तामिळनाडू, उत्तराखंड, अंदमान-निकोबार, दादरा-नगरहवेली, दमण-दीव, लक्षद्वीप, दिल्ली, चंदिगडमध्ये एकाच टप्प्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडली.
तर महाराष्ट्र राज्यात चार टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडली. तर 23 मे रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे.
विशेष म्हणजे यंदा सर्व मतदान केंद्रांवर VVPAT यंत्र बसवण्यात आलं होतं. सुरक्षेच्या कारणास्तव मतदारांना मोबाइल, बॅग्स अन्य कोणते सामनाही केंद्रात नेण्यास सक्त मनाई करण्यात आली होती.
पाहा: VIDEO : वाराणसीत मोदींनी काय काम केलं? काँग्रेस उमेदवाराने केला खुलासा
VVPAT यंत्राची सुविधा
2014च्या निवडणुकीत एकट्या भाजपला 282 जागा मिळाल्या होत्या. पण सध्याची भाजपची सदस्य संख्या 268 एवढी आहे.
2014मध्ये देशात नऊ टप्प्यांमध्ये तर महाराष्ट्रात तीन टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडली होती.
वाचा : 'नवज्योत सिंग सिद्धू यांना मुख्यमंत्री बनण्याची इच्छा'
बहुमताचा जादुई आकडा 272
कोणत्याही पक्षाला बहुमतासाठी 272 जागा आवश्यक असतात. जर बहुमतासाठी काही जागा कमी पडत असतील तर मित्रपक्षांसोबत सरकार स्थापन करता येऊ शकते. राजकीय पक्ष निवडणुकांपूर्वी किंवा निवडणुकांनंतर एकत्र येऊन आपलं सरकार स्थापन करू शकतात.
वाचा : EXIT POLLमुळे NDAमध्ये उत्साह, सर्व पक्षांची बोलावली बैठक
विरोधी पक्षनेते पद कोणाला मिळतं?
लोकसभेतील विरोधी पक्षनेते पदासाठी एकूण जागेच्या किमान 10 टक्के जागा जिंकणं आवश्यक असतं. किमान 55 जागा असतील तरच विरोधी पक्षनेते पद मिळवता येतं. 2014 लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला फक्त 44 जागा मिळाल्या होत्या.
लोकसभा निवडणूक 2014 जागा 543
पक्ष जागा टक्केवारी
भाजप 282 31.04 टक्के
काँग्रेस 44 19.27 टक्के
एडीएमके 37 3.27 टक्के
टीएमसी 34 3.85 टक्के
बीजेडी 20 1.72 टक्के
शिवसेना 18 1.86 टक्के
टीडीपी 16 2.49 टक्के
अन्य 92 36.26 टक्के
News 18-IPSOS Exit Pollचे अचूक अंदाज
लोकसभेच्या निकालांच्या आधी 'न्यूज18' आणि IPSOS यांनी मिळून देशातला सर्वात विश्वसनीय Exit Poll केला आहे. त्यात देशातल्या जवळपास सर्वच राज्यातल्या मतदारांच्या मनाचा कौल जाणून घेण्यात आला आहे. यात लोकसभेच्या 543 जागांपैकी 199 जागांची निवड करण्यात आली. देशातल्या 28 राज्यांमधल्या 199 मतदारसंघातल्या 796 विधानसभा मतदारसंघातल्या मतदारांचा कौल घेण्यात आला. यात 4776 मतदान केंद्रातून 25 मतदारांची निवड करण्यात आली.
या प्रक्रियेत विविध मतदारसंघातल्या मतदान केंद्रांवरच्या मतदारांना विविध प्रश्न विचारण्यात आलेत. 199 लोकसभा मतदारसंघात किमान दीड लाख लोकांची मतं जाणून घेण्यात आलीत. या मतदार संघांची निवड करतानाही विशेष काळजी घेण्यात आली. ज्या मतदार संघात जो उमेदवार सलग दोन किंवा तीन वेळा निवडून आला असेल किंवा जिथे विजयातलं अंतर कमी असेल, ज्या ठिकाणी प्रत्येक वेळेस वेगळे निकाल लागतात, ज्या ठिकाणी दिग्गज नेते निवडणूक लढवत आहेत, अशा विविध मतदारसंघांची निवड करण्यात आली.
त्याचबरोबर प्रत्येक लोकसभा मतदार संघातल्या चार किंवा सहा विधानसभा मतदार संघातल्या सहा मतदान केंद्रातून विविध मतदारांची निवड करण्यात आली. मतदान केंद्रातून बाहेर पडलेल्या प्रत्येक तिसऱ्या मतदाराला हे प्रश्न विचारण्यात आले. यात विविध वयोगट, भाषा, संस्कृती आणि भौगोलिक क्षेत्राचा विचार करण्यात आला. अचूक Exit Poll येण्यासाठी ज्या गोष्टी करण्याची गरज आहे त्या सर्व घटकांची काळजीही घेण्यात आली.
SPECIAL REPORT: मोदींनी तप केलेल्या गुहेत 'हे' शुल्क देऊन तुम्हीही करू शकता ध्यानधारणा