...तर दिल्लीतल्या या बैठकीत आमने-सामने येवू शकतात नरेंद्र मोदी आणि इम्रान खान

...तर दिल्लीतल्या या बैठकीत आमने-सामने येवू शकतात नरेंद्र मोदी आणि इम्रान खान

त्यामुळे या बैठकीला जर इम्रान खान उपस्थित राहिले तर त्यांची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आमने-सामने भेटण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

  • Share this:

नवी दिल्ली17 जानेवारी : सर्जिक स्ट्राईक आणि बालाकोट हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधला संवाद पूर्णपणे थंडावला आहे. आता फक्त औपचारिक तेवढेच संबंध राहिले आहेत. दोन्ही देशात असे ताणलेले संबंध असताना या वर्षाच्या शेवटी राजधानी दिल्लीत एक मोठी आंतरराष्ट्रीय परिषद होणार आहे. शांघाई कॉपरेशन ऑर्गनायजेशन (SC0) ची बैठक होणार असून त्या बैठकीसाठी नियमांप्रमाणे भारत पाकिस्तानला निमंत्रित करू शकते. या बैठकीसाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना निमंत्रित केलं जावू शकते असे संकेत आज परराष्ट्र मंत्रालयाने दिले आहेत. SC0 सहभागी जे देश आहेत त्या सर्व देशांना लवकरच औपचारिक निमंत्रण पाठवलं जाणार आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांना जेव्हा याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता त्यावेळी त्यांनी उत्तर देताना सांगितलं की, सदस्य असलेल्या सर्व 8 देश आणि निरीक्षक असलेल्या 4 देशांना निमंत्रण पाठवलं जाणार आहे.

फडणवीस CMअसताना अंडरवर्ल्ड डॉन त्यांना वर्षावर भेटला, थोरातांचा खळबळजनक आरोप

SCOमध्ये चीन, कझाकिस्तान, किर्गिस्तान, रशिया, तजाकिस्तान, उज्बेकिस्तान, पाकिस्तान आणि भारत हे सदस्य देश आहेत. तर अफगानिस्तान, इराण, बेलारूस आणि मंगोलिया हे निमंत्रित सदस्य आहेत.

होय, करीमलाला इंदिरा गांधींना भेटायचा; नातवाने केला दावा

त्यामुळे या बैठकीला जर इम्रान खान उपस्थित राहिले तर त्यांची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आमने-सामने भेटण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. मात्र मुत्सद्देगीरीच्या पातळीवर पुढे काय घटना घडतात त्यावरच अनेक गोष्टी अवलंबून आहेत.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 16, 2020 09:58 PM IST

ताज्या बातम्या