मराठी बातम्या /बातम्या /देश /

चहातली साखर होणार 'कडू', किंमतीचा उडणार भडका!

चहातली साखर होणार 'कडू', किंमतीचा उडणार भडका!

इंडियन शुगर मिल असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार साखरेचे उत्पादन घटले असून याचा परिणाम दरावर होण्याची शक्यता आहे.

इंडियन शुगर मिल असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार साखरेचे उत्पादन घटले असून याचा परिणाम दरावर होण्याची शक्यता आहे.

इंडियन शुगर मिल असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार साखरेचे उत्पादन घटले असून याचा परिणाम दरावर होण्याची शक्यता आहे.

  • Published by:  Suraj Yadav

नवी दिल्ली, 03 डिसेंबर : देशातील साखरेचं उत्पादन सप्टेंबर महिन्यात संपत असलेल्या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत 30.22 टक्के इतकं घसरून 77.9 लाख टन झालं आहे. उत्पादनात घसरणं झाल्यानंतरही साखरेला मिळणाऱ्या भावामुळे कारखान्यांना शेतकऱ्यांची थकीत बिलं देणं सोपं जात आहे. याबाबत इस्माने सांगितलं की, सध्याच्या गळीत हंगामात डिसेंबर 2019 पर्यंत देशात साखरेचं उत्पादन 77.9 लाख टन इतकं झालं. गतवर्षी 2018-19 मध्ये पहिल्या तिमाहीत हेच उत्पादन 1 कोटी 11.7 लाख टन इतकं होतं.

इंडियन शुगर मिल असोसिएशन (ISMA) ने म्हटलं की, साखर निर्यात चांगली होत आहे. साखर कारखान्यांनी अजुनपर्यंत कमाल स्वीकारार्ह निर्यात कोट्याअंतर्गत 25 लाख टन इतकी साखर निर्यात करण्याचा करार केला आहे. साखरेच्या किंमती उत्तर भारतात 3 हजार 250 ते 3 हजार 350 रुपये प्रति क्विंटर तर दक्षिण भारतात 3 हजार 100 ते 3 हजार 250 रुपये प्रति क्विंटल इतका आहे.

इस्माने म्हटलं की, केंद्राने 2019-20 साठी एफआरपीत वाढ केलेली नाही. तसेच उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाबसारख्या राज्य सरकारांनी एमएसपी वाढवलेला नाही. यामुळे साखरेची किंमत स्थिर आहे. यामुळे कारखान्यांकडून शेतकऱ्यांना उसाचे पैसे देण्यात कोणत्याही अडचणी नाहीत. यंदाच्या गळीत हंगामात साखरेचं 2.6 कोटी टन इतकं उत्पादन होईल असा अंदाज आहे. गतवर्षी 3 कोटी 31.6 टन साखरेचं उत्पादन झालं होतं.

देशातील सर्वात मोठं साखर उत्पादर राज्य असलेल्या महाराष्ट्रात डिसेंबर 2019 पर्यंत साखरेचं उत्पादन 16.5 लाख टन एवढंच झालं. गेल्या वर्षी या काळापर्यंत 44.5 लाख टन उत्पादन झालं होतं. महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेशात सर्वाधिक उत्पादन होतं. या राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी उत्पादनात आतापर्यंत 2 लाख टन जास्त आहे. मात्र, कर्नाटकात गेल्या वर्षीपेक्षा 5 टन साखरेचं उत्पादन घटलं आहे.

पहिल्या तिमाहीमध्ये इस्माने वर्तवलेला अंदाज पाहता साखरेचं उत्पादन कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत. दुसऱ्या तिमाहीतसुद्धा असेच चित्र राहिले तर साखरेचे दर वाढण्याची शक्यता आहे.

वाचा : हिवाळ्यात डिंकाचे लाडू का खावेत? जाणून घ्या कारण

First published:

Tags: Sugar