IndiaStrikesBack- किती शक्तीशाली आहे फायटर जेट मिराज? PAK वर फेकले १ हजार किलोंचे बॉम्ब

एकाचवेळी हे एअरक्राफ्ट ४ मिका मिसाइल, २ मॅजिक मिसाइल, ३ ड्रॉप टँक्सचा मारा करू शकतं. ‘मिराज २०००’ मधून लेझर गायडेड बॉम्ब हल्लाही करता येतो.

News18 Lokmat | Updated On: Feb 26, 2019 11:16 AM IST

IndiaStrikesBack- किती शक्तीशाली आहे फायटर जेट मिराज? PAK वर फेकले १ हजार किलोंचे बॉम्ब

पाकिस्तानच्या दहशतवादी ठिकाणांवर भारताने कारवाई केली. फायटर जेट ‘मिराज २०००’ मधून पाकिस्तानावर १ हजार किलोचे बॉम्ब फेकण्यात आले. या कारवाईत १२ ‘मिराज २०००’ या फाइटर जेटचा वापर करण्यात आला होता. हे ‘मिराज २०००’ फायटर जेट किती शक्तीशाली आहे ते जाणून घेऊ...

‘मिराज २०००’ हे फायटर जेट फ्रान्सच्या डसॉल्ट कंपनीने तयार केले आहे. हे एक मल्टीरोल एअरक्राफ्ट आहे. फ्रान्सच्या वायुदलात याला १९८४ पासून वापरायला सुरुवात केली होती. या एअरक्राफ्टमध्ये ९ पॉइंट असतात, जिथे हत्यारं ठेवता येतात.

या एअरक्राफ्टमध्ये हाय फायरिंग गनपासून मिसाइलपर्यंतची हत्यारं ठेवता येऊ शकतात. डबल सीटर आणि सिंगल सीटर अशा दोन प्रकारात हे एअरक्राफ्ट तयार करण्यात आलं आहे. याच्या दोन्ही विंगवर (विमानाची पाती) वेपन सिस्टम असते.

Loading...

हे फायटर जेट सरळ हवेतून हवेत वार करू शकते. तसेच हवेतून सरळ जमिनीवरही हल्ला करू शकते. या फायटर जेटच्या एअर टू एअर मिसाइल सिस्टमची रेंड ६० किमी पर्यंत आहे. (फाइल फोटो)

एकाचवेळी हे एअरक्राफ्ट ४ मिका मिसाइल, २ मॅजिक मिसाइल, ३ ड्रॉप टँक्सचा मारा करू शकतं. ‘मिराज २०००’ मधून लेझर गायडेड बॉम्ब हल्लाही करता येतो. (फाइल फोटो)

दहशतवादी ठिकाणांचं किती नुकसान झालं हे अजूनपर्यंत कळू शकलं नसलं तरी काश्मीरच्या एलओसीवर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. (फाइल फोटो)

पाकिस्तान लष्कराचे प्रवक्ता मेजर जनरल आसिफ गफूर यांनी ट्वीट करून या हल्ल्याबद्दल माहिती दिली. ट्वीट करत आसिफ यांनी म्हटलं की, ‘भारतीय वायु दलाने नियंत्रण रेषेचं उल्लंघन केलं. पाकिस्तानच्या वायु दलाने लगेच कार्यवाई केली आणि भारतीय विमानांना परत पाठवण्यात आलं.’ (फाइल फोटो)

पाकिस्तानचे सुरक्षा विशेषत्ज्ञ कमर चीमा म्हणाले की, ‘आम्हीही पाकिस्तान सरकारकडून येणाऱ्या अधिकृत प्रतिक्रियेची वाट पाहत आहोत. ’ भारतीय सरकार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असे प्रकार करत असल्याचं त्यांनी म्हटलं. (फाइल फोटो)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 26, 2019 11:15 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...