भारत सरकारकडून 2700 कोटींच्या शस्त्र खरेदीला तातडीने मंजुरी

भारत सरकारकडून 2700 कोटींच्या शस्त्र खरेदीला तातडीने मंजुरी

चर्चेनंतर लष्कराला तातडीने २७०० कोटींच्या शस्त्र खरेदीला मंजूरी दिली. यात अनेक अद्यावत शस्त्र असणार असे म्हटले जात आहे. तसेच २ पानबुड्यांचाही समावेश करण्यात आला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, २७ फेब्रुवारी २०१९- गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींमुळे काश्मिरातील वातावरण तापलं आहे. सीमेवर भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यामध्ये सतत चकमकी सुरू आहेत. जम्मू- काश्मीरमधील अनेक ठिकाणी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये चकमकी सुरू आहेत. दरम्यान, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत अर्ध्या तासाहून जास्त वेळ सीमेवरील परिस्थितीवर चर्चा केली. या चर्चेनंतर लष्कराला तातडीने २७०० कोटींच्या शस्त्र खरेदीला मंजूरी दिली. यात अनेक अद्यावत शस्त्रांचा समावेश असणार असे म्हटले जात आहे. तसेच २ पानबुड्यांचाही समावेश करण्यात येणार आहे. यावेळी डोवाल यांनी गृहमंत्री राजनाथ सिंग यांचीही भेट घेतली. तसेच संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण याही या भेटीवेळी उपस्थित होती.

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या १३ व्या दिवशी भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ नेस्तनाबूत केले. यात सुमारे ३०० हून अधिक दहशतवादी ठार झाले. भारताने हल्ला केल्यानंतर या हल्ल्याचं योग्य उत्तर देऊ असं पाकिस्तानचं म्हणणं आहे. यानंतर उत्तर भारतातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना हाय- अलर्ट देण्यात आले. तसेच काश्मीर आणि श्रीनगरचे विमानतळ प्रवाशी विमानांसाठी काही काळासाठी पूर्ण बंद ठेवण्यात आली आहेत. जम्मू, श्रीनगर, लेहकडे जाणाऱ्या प्रवाशी विमानांना मूळ शहरांकडे परत पाठवण्यात आले आहे.

इंडिगो, गो एअर कंपनीच्या विमानांना पुन्हा दिल्ला विमानतळावर पाठवण्यात आले आहेत. तसेच अमृतसर, चंदिगड, लेह, जम्मू, श्रीनगर, देहरादून, धर्मशाला आणि पठाणकोट विमानतळांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच अनेक व्यावसायिक कंपन्यांच्या विमानांना उड्डाण भरण्यास मनाई करण्यात आली आहे.

भारताने पाकव्याप्त काश्मिरमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकनंतर भारत- पाकिस्तानच्या एलओसीवर तणावाची परिस्थीती निर्माण झाली आहे. यात दर मिनिटाला नवीन अपडेट येत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय वायुसेनेने नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानचे फायटर जेट F16 पाडलं आहे. विमानातील सैनिक पॅराशूटमधून उतरताना दिसले. मात्र ते नक्की कोणत्या दिशेला गेले हे अजून कळू शकले नाही.

दरम्यान, काही वेळापूर्वी पाकिस्तानचं विमान भारताच्या हद्दीत आलं होतं. पण पाकिस्ताननं काही आगळीक करण्याआधीच भारतीय हवाई दलानं या विमानाला परतवून लावलं आहे. परतताना पाकिस्तानी सैनिकांनी बॉम्बहल्ला केला. मात्र त्याच्याने कोणतेच नुकसान झाले नाही. भारतीय हवाई दलानं पाकव्याप्त काश्मीरात जाऊन दहशतवादी तळावर हल्ला केला. त्यानंतर भारताला प्रत्युत्तर देण्याची धमकी पाकिस्तानने दिली होती. यानंतर आता पाकिस्तानचं विमान भारताच्या हद्दीत आलं होतं.

दरम्यान, भारताच्या हवाई हल्ल्यानंतरही पाकच्या कुरापती सुरूच आहेत. जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये पाककडून गोळीबार करण्यात आला. त्याला भारतानेही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी भारताने पाकच्या 5 चौक्या उद्ध्वस्त केल्या तसंच पाकिस्तानचे काही सैनिकही मारले गेल्याची माहिती आहे.

भारतीय हवाई दलाचं विमान कोसळलं, घटनास्थळावरील EXCLUSIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 27, 2019 01:40 PM IST

ताज्या बातम्या