IndiaStrikeBack- भारतीय वायुसेनेचा पाकिस्तानात बॉम्बहल्ला, पाकिस्तानी पत्रकाराचा व्हिडिओ व्हायरल

IndiaStrikeBack- भारतीय वायुसेनेचा पाकिस्तानात बॉम्बहल्ला, पाकिस्तानी पत्रकाराचा व्हिडिओ व्हायरल

भारत- पाकिस्तानच्या सीमेवर लढाऊ विमानं उडल्यानंतर सोमवार आणि मंगळवारी रात्री पाकिस्तानने राजौरी आणि पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर रात्रभर गोळीबारी केली.

  • Share this:

बालाकोट, २६ फेब्रुवारी २०१९- जम्मू- काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये दिवसेंदिवस तणाव वाढत असताना भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये बॉम्ब हल्ला करून दहशतवाद्यांना जशास तसं उत्तर दिलं आहे. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी भारताच्या लढाऊ विमानांनी नियंत्रण रेषेचं उल्लंघन केलं असं ट्वीट केलं. भारतीय वायुसेनेच्या विमानांनी मुजफ्फराबाद सेक्टरमध्ये घुसून पेलोड फेकले जे बालाकोटमध्ये पडले. यानंतर पाकिस्तानने प्रत्युत्तरादाखल भारतीय विमानांवर गोळीबार केला. यानंतर भारतीय विमान पुन्हा भारतात परतले.

या दाव्यानंतर पाकिस्तानी पत्रकार अर्सलान सिद्दीकीने एक व्हिडिओ ट्वीट केला. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी लष्कर भारतीय विमानांवर बॉम्बहल्ला करताना दिसत असून परतवार होताच भारतीय विमान माघारी परतताना दिसत आहेत. असे असले तरी हा व्हिडिओ खरा आहे की नाही हे अजूनपर्यंत समजू शकले नाही.

पत्रकार अर्सलान सिद्दीकीने हा व्हिडिओ शेअर करताना म्हटले की, ‘मुजफ्फराबाद सेक्टरमध्ये भारतीय विमानांनी घुसखोरी केली. पाकिस्तानच्या वायुसेनेने वेळेत येऊन त्यांना प्रत्युत्तर दिले. या हल्ल्यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.’ बालाकोट या पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय हवाई दलानं केलेल्या हल्ल्यात २०० ते ३०० दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे.पाकिस्तानने रात्रभर केली गोळीबार-

असं म्हटलं जातं की, भारत- पाकिस्तानच्या सीमेवर लढाऊ विमानं उडल्यानंतर सोमवार आणि मंगळवारी रात्री पाकिस्तानने राजौरी आणि पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर रात्रभर गोळीबारी केली. अनेक ठिकाणी त्यांनी मोर्टारची फायरिंग केली.

पुलवामा हल्ल्यानंतर दोन्ही देशात तणाव...

पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचा वातावरण आहे. भारताने पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव टाकत चारी मुंड्या चीत केलं. यात पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशन हा दर्जाही भारताने काढून घेतला.

पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं दहशतवाद्यांना धडा शिकवायला सुरुवात केली आहे. अखेर भारतीय हवाई दलानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं. यावेळी भारतीय हवाई दलानं दहशतवादी तळावर १००० किलोचे बॉम्ब फेकले. त्यामुळे दहशतवाद्यांचं मोठं नुकसान झालं. एएनआयनं ट्विट करत याबद्दलची माहिती दिली. मिराज विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून ही कारवाई केली.

#News18RisingIndia Summit 2019 मधील पंतप्रधान मोदींचं UNCUT भाषण


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 26, 2019 10:00 AM IST

ताज्या बातम्या